जामखेड न्युज – – – –
जामखेड महाविद्यालयातील शैलेश्वर गिरी या विद्यार्थ्यांची तमिळनाडूतील कोयमतूर येथील भारथिअर विद्यापीठ येथे होणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्याच्या दहा स्वयंसेवकांच्या संघामध्ये त्याची निवड झाली आहे.
महाविद्यालयात व्दितीय वर्ष वाणिज्य या वर्गात शिकणाऱ्या शैलेश्वर वसंत गिरी या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय सेवा योजना विभागातून या स्वयंसेवकाची निवड होऊन राज्यस्तरीय प्रतिनिधीत्व करण्याचा बहुमान जामखेड महाविद्यालयाला मिळाला आहे. १८ ते २४ मे २०२२ दरम्यान होणाऱ्या या राष्ट्रीय शिबिरात विविध कलागुण संपन्न विद्यार्थी निवडले जातात. विद्यार्थी जीवनात ही निवड वैभवशाली सन्मान मानली जाते. या निवडीबद्दल दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. उध्दव(बापू) देशमुख, उपाध्यक्ष मा. अरुणशेठ चिंतामणी, सचिव मा. शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेशजी मोरे सह सर्व संचालक, प्राध्यापक, व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले आहे.
पोलीस निरीक्षक मा. संभाजीराव गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांनी विशेष कौतुक केले आहे. शैलेश्वर गिरी या विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आज शैलेश्वर गिरी याला तमिळनाडू प्रवासासाठी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. सुनिल नरके यांनी शुभेच्छा देऊन निरोप दिला. त्याच्या या यशासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. अविनाश फलके, डॉ. नामदेव म्हस्के यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. यावेळी डॉ. केळकर, प्रा. पवार, प्रा. राळेभात, प्रा. ऋषीकेश देशमुख प्रा. तुकाराम घोगरदरे व इतर प्राध्यापक उपस्थित होते.