साकत ग्रामपंचायत उपसरपंचपदी सत्तांतर संजय वराट व प्रा. अरुण वराट यांच्या गटाचे राजू वराट यांची उपसरपंचपदी निवड

0
235

जामखेड न्युज – – – – –

    राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची समजली जाणार्‍या साकत ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सत्तांतर होऊन राजू वराट यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे राजू वराट हे संजय वराट व प्रा. अरुण वराट यांच्या गटाचे समजले जातात. या निवडीमुळे सत्ताधारी गटाला मोठा धक्का समजला जात आहे.
    साकतची ग्रामपंचायत डॉ. भगवानराव मुरुमकर व हनुमंत पाटील यांच्या ताब्यात आहे. सरपंच मनिषा पाटील तर बळीराम कोल्हे हे उपसरपंच होते चार महिन्यापूर्वी उपसरपंच बळीराम कोल्हे यांनी राजीनामा दिला होता त्यामुळे या रिक्त पदावर आज मतदान झाले. सरपंच मनिषा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया झाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविस्तार अधिकारी राजेंद्र वळेकर यांनी काम पाहिले. राजू वराट यांची उपसरपंचपदी निवड जाहीर होताच गुलालाची उधळण करीत व फटाक्यांच्या आतषबाजीने आनंदोत्सव साजरा केला.
   यावेळी जामखेड न्युजशी बोलताना संजय वराट म्हणाले की, सात सदस्य सत्ताधारी गटाकडे असतानाही एक सदस्य मतदानात फुटला त्यांच्या एका वर्षाच्या कामकाजाला कंटाळून एक सदस्य फुटला व आमच्या गटाच्या राजू वराट यांना सात मते तर विरोधी गटाचा मिनल घोडेस्वार यांना सहा मते पडली यामुळे राजू परमेश्वर वराट यांची उपसरपंचपदी निवड झाली. ही सत्तांतराची नांदी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दिसून येईल असा विश्वास वराट यांची व्यक्त केला.
  यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय वराट, प्रा. अरुण वराट,
चेअरमन कैलास वराट सर, माजी कृषी अधिकारी सुरेश वराट, माजी सरपंच कांतीलाल वराट, महादेव वराट, शहादेव वराट, विठ्ठल वराट, नागनाथ वराट, रामहरी वराट, सचिन नेमाने, गणेश वराट, गणेश कडभने, विष्णु लहाने, संतोष वराट, शरद वराट, गोरख वराट, अशोक वराट, महादेव वराट, रामभाऊ वराट, नानासाहेब लहाने, पांडूरंग सानप, काशिनाथ पुलवळे, यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here