Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड पोलिस स्टेशन आयोजित रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

जामखेड पोलिस स्टेशन आयोजित रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

0
343
जामखेड प्रतिनिधी 
               जामखेड न्युज – – – – – 
        जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या संकल्पनेतून दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त तालुक्यातील १० ठिकाणी एकाच दिवशी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरास तरूणांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन आढावा घेतला.
 कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा पाहता जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी मागील वर्षी दि. १ जानेवारी रोजी तालुक्यातील अनेक ठिकाणी एकाच वेळी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी चांगला प्रतिसाद मिळाला होता. अनेक रक्त दात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले होते.
 त्यानुसारच यावेळी ही माझे जामखेड, माझी जबाबदारी या सदराखाली दि. १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त एकाच वेळेस जामखेड तालुक्यात १० ठिकाणी. भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले असून रविवार दि .०१ मे २०२२ रोजी  सकाळी ९ .३० ते ०५.०० वा . पर्यंत तालुक्यातील १ ) महावीर मंगल कार्यालय २ ) जामखेड महाविद्यालय . ३ ) खर्डा दुरक्षेत्र ४ ) नान्नज दुरक्षेत्र ५ ) फक्राबाद ६ ) जवळा ७ ) साकत ८ ) राजुरी ९ ) अरणगाव १० ) देवदैठण , ता . जामखेड जि . अ . नगर याठिकाणी रक्तदात्यांना आपले रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे.
  साकत येथे रक्तदान शिबिरास भेट देण्यासाठी पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड आले असता मोठ्या उत्साहात रक्तदान शिबीर सुरू होते यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवानराव मुरुमकर, पंचायत समितीचे माजी सभापती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय वराट सर, सरपंच हनुमंत पाटील, माजी चेअरमन प्रा. अरुण वराट सर, चेअरमन कैलास वराट सर,
माजी सरपंच हरिभाऊ मुरुमकर, कांतीलाल वराट, महादेव वराट सर, अजित वराट, ज्येष्ठ शिक्षक उदयकुमार दाहितोडे
पोलीस कर्मचारी संजय लाटे, सचिन पिरगळ, पोलीस पाटील महादेव वराट सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. साकतमध्ये दुपारी बारा पर्यंत २७ रक्तदात्यांनी रक्तदान केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!