केदार शिंदे- अंकुश चौधरीच्या गाडीला अपघात, राज ठाकरेंसोबत जात होते औरंगाबादला

0
210
जामखेड न्युज – – – – 
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांना नगरच्या पुढे किरकोळ अपघात झाला आहे. मागील बाजूला असलेल्या तीन गाड्या एकमेकांना धडकल्या. यात कोणीही जखमी झाले नाही. नगर-औरंगाबाद महामार्गावरील घोडेगाव इथे ही घटना घडली.
राज ठाकरेंच्या ताफ्यातील तीन गाड्या एकमेकांना मागून धडकल्या. यात दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेता अंकुश चौधरी यांच्या गाडीच्या बोनेटचं नुकसान झालं. उद्या (रविवारी) होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरे हजारो कार्यकर्त्यांसह पुण्याहून औरंगाबादकडे रवाना होत असताना रस्त्यात हा अपघात झाला. राज यांच्या ताफ्यात केदार आणि अंकुशही आहेत. या किरकोळ अपघातात त्यांची गाडी कुठेही थांबली नाही आणि ते औरंगाबादकडे रवाना होत राहिले.
राज ठाकरे औरंगाबादला जाताना
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अहमदनगर शहरात जंगी स्वागत करण्यात आले. औरंगाबादला जाताना ते अहमदनगरच्या एसटी बसस्थानक चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करण्यासाठी थांबले होते. यापूर्वी त्यांनी अहमदनगरच्या बायपास चौकातील एका शाकाहारी हॉटेलमध्ये जेवण घेतलं. तिथेही त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर ठाकरे आपल्या ताफ्यासह अहमदनगर शहरात आले. बस स्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केलं. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी ठाकरे यांचे ढोलताशांच्या गजरा स्वागत केले.
राज ठाकरे यांची महाराष्ट्रदिनी औरंगाबादेत सभा पार पडणार आहे. त्याआधी शुक्रवारी ते मुंबईहून पुण्याकडे रवाना झाले. आज सकाळी पुण्यातल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन ते औरंगाबादकडे रवाना झाले. तत्पूर्वी वाटतेच त्यांनी वढू तुळापूरला जाऊन संभाजीराजेंच्या समाधी स्थळावर माथा टेकवला. त्यांच्या थोर कार्याचं स्मरण केलं. संभाजीराजेंच्या विचारांचा जयघोष केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here