स्वातंत्र्यवीर सावरकर जिमखाना शुभारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – मंगेश ( दादा) आजबे

0
222
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – – 
        जामखेड येथे लोकसहभागातून सारोळा रोड वर साकारलेल्या  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जिमखाना शुभारंभ , शस्त्रास्त्रांचे पुजन, सत्कार समारंभ व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी खा. सुजय विखे, आ. रोहित पवार, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, आ. सुरेश धस, तहसिलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक मंगेश (दादा) आजबे यांनी केले आहे.
       शनिवार दि . ३०/०४/२०२२ रोजी सारोळा रोडवरील शंभुराजे कुस्ती संकुल व सावरकर जिमखाना येथे होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अर्जुनवीर पुरस्कार सन्मानित  काकासाहेब पवार तर महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील, उपमहाराष्ट्र केसरी पै. विशाल बनकर, महानभारत केसरी पै. सिकंदर शेख या मान्यवरांच्या सत्काराच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
  जामखेड न्युजशी बोलताना मंगेश ( दादा) यांनी सांगितले की, दि. ३०/०४/२०२२ रोजी पै. पृथ्वीराज पाटील, पै. विशाल बनकर, पै. सिकंदर शेख, पै. काकासाहेब पवार यांची भव्य मिरवणुक बस डेपो ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जिमखाना सारोळा रोड काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी दुपारी २ वाजता भव्य मोटारसायकल रॅली मिरवणुक, दुपारी ४ ते ४.३० पर्यंत पुजन विधी कार्यक्रम  व  ४.३० वाजेनंतर सत्कार समारंभ अश्या भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक मंगेश ( दादा ) आजबे, सर्व पैलवान शंभुराजे कुस्ती संकुल व  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जिमखाना, जामखेड यांच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here