Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या पेट्रोल पंपावरील व्यवस्थापक दहा लाख रूपये घेऊन फरार

पेट्रोल पंपावरील व्यवस्थापक दहा लाख रूपये घेऊन फरार

0
239
जामखेड न्युज – – – 
अहमदनगर शहरातील नगर मनमाड रोडवर असलेल्या दीपक पेट्रोल पंपावरील मॅनेजरने दहा लाख रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे.
याबाबत तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये अनिल जोशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑगस्टीन जॉर्ज गोन्सालवेस हा अनिल जोशी यांच्या मालकीच्या दीपक पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून अनेक वर्षांपासून काम करत होता.
दिवसभराची पेट्रोल पंपावरील सर्व रक्कम बँकेत भरणे जमा करणे ही कामेऑगस्टीन जॉर्ज गोन्सालवेस अनेक वर्षांपासून करत असल्याने पेट्रोल पंपावरील सर्व व्यवहाराची रक्कम त्याच्यासुथो ताब्यात असायची याचाच फायदा घेऊन  सोमवारी पेट्रोल विक्री मधून दिवसभर झालेल्या जमा रक्कम आणि मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत जमा झालेली सुमारे दहा लाख तीस हजार रुपये घेऊन ऑगस्टीन जॉर्ज गोन्सालवेस फरार झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!