गुणरत्न सदावर्ते पुन्हा जेलमध्ये!!!

0
234
जामखेड न्युज – – – – 
अॅड गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव कोर्टाने आणखी २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांची विनंती मान्य करत कोर्टाने सदावर्ते यांना १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांच्या वतीने सरकारी वकील अॅड प्रदीप घरत यांनी जोरदार युक्तीवाद करत तपास प्राथमिक टप्प्यात असल्याने पोलिस कोठडी आवश्यक असल्याचं सांगत सदावर्तेंच्या विरोधात पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत. पोलिस कोठडीच्या दोन दिवसांत त्यांची चौकशी केली गेली आहे. पण दोन दिवसांचा कालावधी हा चौकशीसाठी पुरेसा नाहीय. ‘कुछ बातें हो चुकी है, कुछ बातें अभी है बाकी’, अशी परिस्थिती असल्याने सदावर्तेंना पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी केली होती. न्यायालयाने सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचे युक्तीवाद ऐकल्यानंतर सदावर्तेंना आणखी २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
‘गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी आंदोलकांकडून १.८० कोटी रुपये जमवले’
अ‍ॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी आंदोलकांकडून तब्बल पावणेदोन कोटी रुपये जमवल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी एसटी संपकरी मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत. या काळात गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी प्रत्येक एसटी कर्मचाऱ्यांकडून ५३० रुपयांप्रमाणे १.८० कोटी रुपये गोळा केले. हे सर्व पैसे गुणरत्न सदावर्ते यांच्याकडेच जमा करण्यात आले होते, अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. या पैशांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही सरकारी वकिलांनी केली.
गुणरत्न सदावर्ते यांच्या दोन दिवसांच्या कोठडीचा कालावधी संपल्याने सोमवारी त्यांना गिरगाव न्यायालयात सादर करण्यात आले होते. या सुनावणीत सरकारी वकिलांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला. यामध्ये त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी आंदोलकांकडून १.८० कोटी रुपये घेतल्याचा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदावर्ते यांचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी या गोष्टीवर आक्षेप घेतला. सदावर्ते यांनी ज्या एसटी आंदोलकांकडून ५३० रुपये घेतले आहेत, त्यांच्यापैकी एकाने तरी तक्रार केली आहे का? मग हा मुद्दा न्यायालयात उपस्थित करण्याचे प्रयोजन काय, असा सवाल गिरीश कुलकर्णी यांनी विचारला.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही याच मुद्द्यावरून सदावर्ते यांना लक्ष्य केले होते. गुणरत्न सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांची केस फुकट लढवत नव्हते. त्यासाठी सदावर्ते यांना कोट्यवधी रुपये मिळाले होते, असे रोहित पवार यांनी म्हटले होते.
‘सगळं षडयंत्र सदावर्तेंनी रचलं’
शरद पवार यांच्या घरावरील हल्ला हा पूर्वनियोजित कट होता.६ एप्रिल रोजीच ठरलं, पवारांच्या घरावर हल्ला करायचा, सगळं षडयंत्र अॅड गुणरत्न सदावर्तेंनी रचलं. १२ एप्रिलला बारामतीत आंदोलन करायचं, हे सदावर्ते भ्रम करण्यासाठी सातत्याने सांगत होते. पण सगळं नियोजन गुणरत्न सदावर्तेंनी केलं. त्यानुसार ठरल्याप्रमाणे पवारांच्या घरावर एसटी कामगार चालून गेले. पवारांच्या घरावर हल्ला झाला तेव्हा सदावर्तेंना नागपूरमधून फोन येत होते, असा दावा सरकारी वकिलांनी न्यायालयात केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here