जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
एसटी कर्मचाऱ्यांनी आधी पेढे वाटून आनंद साजरा केला. मात्र दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला हे संशयास्पद आहे. सरकार पाडायचे प्रयत्न फसले, ईडी च्या कारवायांना दमले सत्येशिवाय जगणे भाजपाला अशक्य झाले आहे.म्हणून आता नेत्यांच्या घरावर हल्ले सुरू केले असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधकांवर केला.
जामखेड येथे नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत परीसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या वेळी पाटील बोलत होते. या वेळी महाराष्ट्र विद्यार्थी परीषदेचे अध्यक्ष सुनिल गव्हाणे, प्रदेश युवक अध्यक्ष महेबूब शेख, युवक जिल्हा अध्यक्ष कपील पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर राळेभात, कर्जत तालुका अध्यक्ष काकासाहेब तापकीर, नितीन धांडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषाताई गुंड, सभापती राजश्रीताई मोरे, सुर्यकांत मोरे, नगराध्यक्षा उषाताई राऊत, अंजली ढेपे, राजेंद्र कोठारी, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सोशल मिडीया चे काकासाहेब कोल्हे, ज्योतीताई साखरे, संध्या सोनवणे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की महाराष्ट्रात कुठलाच आमदार रोहित पवार यांच्या सारखे नियोजनबद्ध काम करु शकत नाही त्यामुळे आ. रोहित पवार यांना पक्षाचे काम वाढवण्यासाठी महाराष्ट्रात पाठवायचे आहे. कर्जत जामखेड तालुक्यात विकास कामे वेगाने होत आहेत ही कामे होत आसताना मी रोहित पवार यांच्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे. एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की पवार साहेब नेहमीच कर्मचाऱ्यांच्या बाजुने उभे राहिले. जे एस टी कर्मचाऱ्यांना द्यायचे आहे ते काम पवार साहेबांनी केले आहे. कुठलंही आंदोलन आतापर्यंत नेत्याच्या घरापर्यंत नेत्यापर्यंत गेलेलं नाही. या सरकारनं जे निर्णय कर्मचाऱ्यांसाठी घेतले ते कुणीच घेतलेले नाहीत. मात्र घरावर दगड फेकून, चप्पल फेकून प्रश्न सुटणार नाहीत. या हल्ल्यामागे कोण आहे त्यांची नावे लवकरच बाहेर येतील. सत्येशिवाय भाजपला जगणं अशक्य झाले आहे त्यामुळेच हे हल्ले सुरू केले आहेत.
देशात पाहीले तर फक्त महाराष्ट्रातच ईडी च्या सर्वात जास्त धाडी टाकण्यात आल्या व महाविकास अघाडीला अडचणीत आणण्याचे काम केले मात्र विरोधकांचा हा प्रयत्न फसला आहे. महागाई बाबत पंतप्रधान कधीच बोलत नाहीत महागाईचा दंड भाजपने केला आहे. महागाईमध्ये आजुन ही अर्थव्यवस्था टीकुन आहे याला कारण म्हणजे मागील काळातील पंतप्रधान मनमोहन सिंग आहेत. मनमोहन सिंग यांच्या मुळे अर्थव्यवस्था टीकुन राहीली आहे.
आमदार रोहित पवार यांनी बोलतांना सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार समजले पाहिजेत. हे विचार कार्यकर्त्यांन कडुन लोकांन पर्यंत पोहोचले पाहिजेत या साठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कर्जत जामखेड मधिल पंचवीस वर्षे सुरू आसलेली दहशत संपवली आहे. बाहेरून गुंड बोलवुन दहशतीचे राजकारण होत होते मात्र हे राजकारण आम्ही मोडुन काढले आहे. विकास कामे होतच रहातील मात्र शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचवुन त्यांना सेवा देण्याचे काम आम्ही करत आहोत. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ची सत्ता दिसली पाहिजे या साठी जोमाने कार्यकर्त्यांन कामाला लागले पाहिजे कारण कर्जत जामखेड मधुन भाजप हद्दपार करायची आहे.
चौकट
आ. रोहित पवार यांच्या महाकनेक्ट अॅप चा झाला शुभारंभ.
महाकनेक्ट अॅप मधुन लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच आपल्या भागातील तक्रार नोंदवण्यासाठी तयार करण्यात आले आहे. आ. रोहित पवार यांच्या दैऱ्याची माहिती, शासकीय योजनांची माहिती तसेच कार्यकर्त्यांसाठी निवडणुकीच्या नियोजनांची माहिती देण्यात आली आहे. याचा शुभारंभ नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आ रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आली.