Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या केमिकल कंपनीला भीषण आग आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाकडून प्रयत्न सुरु

केमिकल कंपनीला भीषण आग आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाकडून प्रयत्न सुरु

0
348
जामखेड न्युज – – – – 
पुणे-सातारा महामार्गालगत असलेल्या कासुर्डी येथील इलेजर सोलटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भीषण आग लागली आहे. संबंधित कंपनी ही पेंटिंग केमिकल कंपनी असल्याने आगीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे परिसरात धुराचे लोटचं लोट पसरलेले पाहायला मिळत आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सध्या अग्निशामक दलाकडून सुरु आहे. संबंधित दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र आगीमुळे कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.
                        ADVERTISEMENT
संबंधित कंपनी ही केमिकलची असल्याने आगीचा मोठा भडका उडाला आहे. आगीमुळे निर्माण झालेल्या धुराचे मोठमोठे लोळ लांबून दिसत आहेत. संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेच अग्निशामन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!