Thursday, April 2, 2026
Home ताज्या बातम्या डेरवण येथील राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत उपेश धनलगडे यास गोल्ड मेडल

डेरवण येथील राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत उपेश धनलगडे यास गोल्ड मेडल

0
352
जामखेड न्युज – – – 
डेरवण युथ २०२२ राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत उपेश राघवेंद्र धनलगडे याने प्रथम क्रमांक मिळवत गोल्ड मेडल पटकावले आहे. त्याबद्दल त्याच्यावर जामखेड, नगर व खर्डा परिसरातून अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
   ल. ना. होशिंग विद्यालयातील क्रीडा शिक्षक राघवेंद्र धनलगडे यांचा उपेश हा मुलगा तर महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी सन्माननीय श्री संतोषजी धनलगडे साहेब ( गुप्तचर विभाग महाराष्ट्र ) यांचा तो पुतण्या आहे.
                        ADVERTISEMENT
त्यांच्या यशाबद्दल दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उध्दवराव देशमुख, उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी,
सचिव सचिव शशिकांत देशमुख होते, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेशजी मोरे सह सर्व संचालक मंडळ प्राचार्य श्रीकांत होशिंग, माजी प्राचार्य अनंता खेत्रे, क्रीडा शिक्षक तसेच नातेवाईक व मित्रमंडळी यांनी अभिनंदन केले आहे
ल ना होशिंग माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रथम वर्ष विज्ञान शाखेचा स्टार खेळाडू…  ‘ क्रीडा हेच जीवन ” हे ध्येय हृदयाशी बाळगून सदैव क्रीडेची कठोर तपश्चर्या ( व्रत ) करणारा खेळाडू तालुका, जिल्हा, विभाग, राज्य अशा अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्या अंगभूत कलेच्या अविष्कारातून क्रीडांगण गाजवणारा मेहनती युवक
महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी सन्माननीय श्री संतोषजी धनलगडे साहेब ( गुप्तचर विभाग महाराष्ट्र ) यांचे पुतणे ल ना होशिंग विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख क्रीडारत्न  व आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार विजेते राघवेंद्र धनलगडे यांचे चिरंजीव…
17 महाराष्ट्र बटालियन एन सी सी अहमदनगर जामखेड महाविद्यालय जामखेड एस डी विंगचा बेस्ट कॅडेट
उपेश राघवेंद्र धनलगडे आहे
डेरवण येथे झालेल्या युथ राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त गोल्ड मेडल चा मानकरी ठरला.
या यशाबद्दल एन सी सी विभागाच्या वतीने मनस्वी हार्दिक हार्दिक खूप खूप अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.
उपेशला मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक धनलगडे, साळुंके सर, जरे सर यांनी खूप खूप अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!