जामखेड न्युज – – – –
अर्श बागवान हा गेल्या तीन वर्षांपासून आपल्या वाढदिवशी रक्तदान करतो रक्तदान करून वाढदिवस साजरा करतो सध्या तो लातुर येथे नीट परीक्षेची तयारी करत आहे आज त्याचा वाढदिवस त्याने कसलाही डामडौल व केक किंवा पार्टी न ठेवता रक्तदान करत आपला वाढदिवस साजरा केला सलग तीन वर्षांपासून त्याचा हा उपक्रम सुरू आहे. इतक्या लहान वयात ही सामाजिक जाणीव याबद्दल अर्शवर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
चि. अर्श चा आज वाढदिवस आहे. तो लातुर येथे एम. बी. बी. एस. साठी नीट तयारी करत आहे. अर्श याने वयाच्या १८ व्या वर्षी पहिले रक्तदान केले होते आणी आज त्याचा २० वा वाढदिवस आहे. आजही रक्तदान केले त्यामुळे हॅटट्रिक झाली आहे.
त्याने संकल्प केला आहे की वाढदिवसाला केक कापणे,पार्टी देने मिञांची गर्दी करूण काहीच साद्य होत नाही,त्या पेक्षा आपण दर वर्षी वाढदिवसाला रक्तदान करून देश सेवा करू असा संकल्प केला आहे.
अर्श हा साकेश्वर विद्यालय साकत येथील अध्यापक डाँ जाहेद बागवान सर यांचा मोठा चिरंजीव आहे.