ऊसतोड मजुराचा मुलगा झाला PSI, लहानपणीच हरवले वडिलांचे छत्र

0
222
जामखेड न्युज – – – 
 भगवानगड परिसरातील ऊसतोडणी कामगारांच्या पंढरीतील जवळवाडी (ता. पाथर्डी) येथील जालिंदरनाथ माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी प्रवीण शिरसाट याने २०१९ मध्ये झालेले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) परीक्षेमध्ये एनटी-डी प्रवर्गात राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. त्याचे पाचवी ते दहावीचे शिक्षण जालिंदरनाथ माध्यमिक विद्यालयात झाले. पुढील शिक्षण त्याने पुण्यात पूर्ण केले. सिव्हिल इंजिनिअरची पदवी मिळविली. त्यानंतर राज्यसेवेचा अभ्यास केला. त्यातूनच यश मिळविले. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले. मात्र आई पंचफुला शिरसाठ यांनी त्याला पाठबळ दिले.
                           ADVERTISEMENT 
जालिंदरनाथ विद्यालयाच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला.
यावेळी आई पंचफुला शिरसाट, बहीण सविता नागरे, पत्नी कोमल शिरसाट, विद्यालयातील सविता डोंगरे, अनिस शेख, राजेंद्र खेडकर, सुभाष भागवत, सतीश भोसले, मच्छींद्र आठरे, अविनाश घुगे, गंगाधर डोंगरे, शहादेव फुंदे, केशव ढाकणे, पांडुरंग शिरसाट, खरवंडी येथील आरोग्य अधिकारी डॉ. बाबासाहेब सानप, अशोक शिंदे, अजित सानप, देवीदास आंधळे, पत्रकार दादासाहेब खेडकर, अशोक आव्हाड, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. सविता डोंगरे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन राजेंद्र खेडकर यांनी केले. सुभाष भागवत यांनी आभार मानले. मुख्याध्यापक मिथुन डोंगरे यांच्या मार्गदर्शनामुळे यश मिळवू शकलो, असे प्रवीणने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here