जामखेड न्युज – – –
रोजच्या छेडछाडीला कंटाळून मुलींनी रोडरोमिओला चांगलीच अद्दल घडवली आहे. या रोडरोमिओला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. जळगाव जिल्ह्यातल्या बोदवडमध्ये एका रोडरोमिओला शाळकरी मुलींनी चोप दिला. बस बंद असल्याने येवतीमधल्या मुली पायी शाळेत जायच्या. हा तरुण त्यांना रोज छेडायचा. या त्रासाला मुली कंटाळलेल्या होत्या. अखेर मुलींनी त्याला चांगलाच चोप दिला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT 

शाळेत जात असताना आजही असाच प्रकार या तरुणाने केल्यावर संतप्त झालेल्या या मुलींनी आपला रुद्रावतार दाखवत या तरुणाला चपलानी चांगलाच चोप दिला. त्याला चांगलीच अद्दल घडविली आहे. स्थानिकांनीही तरुणाला मारहणा केली.