15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांचा रिन्यूवेशनचा खर्च वाढणार

0
205
  • जामखेड न्युज – – – 
 सध्या सगळ्यांकडे स्वतःची दुचाकी तसेच चारचाकी बघायला मिळते. मात्र, जर तुमच्याकडे असलेले वाहन पंधरा वर्ष जुने असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण, १ एप्रिल 2022 पासून पंधरा वर्षांपेक्षा अधिक जुन्या वाहनाचे पुन्हा रजिस्ट्रेशन करणे महाग होणार आहे. जुन्या वाहनाचे रजिस्ट्रेशन रिन्यू करण्यासाठी पुढील महिन्यापासून जवळपास आठ पट जादा रक्कम मोजावी लागणार आहे.
                           ADVERTISEMENT
                   
15 वर्षांपेक्षा अधिक जुन्या वाहनाचे रजिस्ट्रेशन रिन्यू करण्यासाठी पुढील महिन्यापासून सहाशे रुपयांऐवजी पाच हजारांचा खर्च होणार आहे. तर ज्या ग्राहकांकडे 15 वर्षांपेक्षा अधिक जुनी दुचाकी आहे, अशा ग्राहकांना रजिस्ट्रेशन रिन्यूवेशनला 300 रुपयांऐवजी 1 हजार रुपये जमा करावे लागणार आहेत.
15 वर्षांपेक्षा अधिक जुन्या इम्पोर्टेड गाड्यांसाठी 15 हजार ते चाळीस हजारांपर्यंत खर्च येणार आहे. जुन्या वाहनांमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. वाहनांपासून होणाऱ्या वायू प्रदूषणाला आळा घालण्याचा सरकारचा प्लॅन आहे. त्यामुळे रजिस्ट्रेशन रिन्यू शुल्कात वाढ करण्यात आली आहे. एवढेच नाही तर नव्या नियमानुसार 15 वर्षांपेक्षा अधिक जुन्या वाहनांना दर पाच वर्षांनी रजिस्ट्रेशन रिन्यू करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
फिटनेस टेस्टचे दर वाढले
यासोबतच 15 वर्षांपेक्षा अधिक जुन्या प्रवासी वाहनांच्या फिटनेस टेस्टच्या खर्चात देखील वाढ होणार आहे. वाहतूक मंत्रालयाने ठरवलेल्या नव्या दरानुसार टॅक्सच्या फिटनेस टेस्टसाठी एक हजार रुपयांऐवजी सात हजार रुपये भरावे लागणार आहे. म्हणजेच फिटनेस टेस्ट खर्चात देखील दुप्पट वाढ होणार आहे. 15 वर्षांपेक्षा अधिक जुनी ट्रक असल्यास तिच्या फिटनेस टेस्ट साठी दीड हजारांऐवजी साडेबाराहजार रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच आठ वर्षांपेक्षा अधिक जुन्या वाहनांसाठी फीटनेस प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी स्क्रॅप पॉलिसी
केंद्र सरकारच्या वतीने जुन्या वाहनांपासून होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी स्क्रॅप पॉलिसी सुरू करण्यात आली आहे. पंधरा वर्षांपेक्षा अधिक जुन्या वाहनांच्या मालकाने रिन्यूवेशनचा खर्च टाळण्यासाठी स्क्रॅप पॉलिसीचा पर्याय निवडावा यासाठी फीटनेस टेस्ट आणि रजिस्ट्रेशन रिन्यूवेशन फीमध्ये वाढ करण्यात आली आहे. तुम्ही तुमचे जुने वाहन स्क्रॅप केल्यास तुम्हाला दुसरे नवे वाहन खरेदी करताना टॅक्समधून देखील काही प्रमाणात सूट देण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here