चौंडी ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता माजी मंत्री राम शिंदे यांना धक्का सरपंच पदी आशाबाई उबाळे तर उपसरपंच पदी कल्याण शिंदे यांची निवड

0
306
जामखेड प्रतिनिधी
  तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणार्‍या माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या गावातील चौंडी ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे सरपंच पदी आशाबाई सुनील उबाळे तर उपसरपंच पदी कल्याण रामभाऊ शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात ही ग्रामपंचायत आल्याने माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. स्वतः च्या गावातीलच ग्रामपंचायत मध्ये सत्ता राखण्यात शिंदे यांना अपयश आले आहे.
      चौंडी ग्रामपंचायत निवडणूकीत आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा ग्रामविकास पॅनलने ९ पैकी ७ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. आज दि. ९ रोजी सकाळी आकरा वाजता सरपंच पदासाठी आशाबाई सुनील उबाळे यांनी अर्ज दाखल केला होता त्यांना सूचक म्हणून रेणुका शिंदे तर उपसरपंच पदासाठी कल्याण रामभाऊ शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांना सूचक म्हणून गणेश उबाळे होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत सरपंच पदासाठी एकच व उपसरपंच पदासाठी एकच अर्ज आल्याने निवडणूक आभासी अधिकारी आर. डी. देवैज्ञ व सहाय्यक सुखदेव कारंडे यांनी सरपंच व उपसरपंच निवडी जाहिर केल्या यावेळी सर्व सदस्य हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here