जामखेड प्रतिनिधी
वेगवेगळ्या कार्यक्रमात नंबर येणे महत्वाचे नाही तर महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. ज्या महिलांना शिलाई काम, ब्युटी पार्लरच्या कामाची आवड आहे त्यांनी आमच्या संस्थेकडे नाव नोंदणी करा त्यांना फॅशन डिझायनरचे प्रशिक्षक देऊन संस्थेचे प्रमाणपत्र मिळणार आहे त्यामुळे बॅकेकडून कर्ज मिळण्यास मदत होईल व महिला स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी वेगवेगळ्या कला शिकणे महत्त्वाचे आहे असे सुनंदाताई पवार यांनी सांगितले.
शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये फिरोज बागवान, शकिला फिरोज बागवान व नाजमीन बागवान यांनी हळदी- कुंकू कार्यक्रम तसेच संगित खुर्ची व खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुनंदाताई पवार बोलत होत्या यावेळी फिरोज बागवान, नाजमीन बागवान, संगिता मधुकर राळेभात, अपुर्वा गिरमे, साळवे मॅडम, उगले मॅडम, अमोल गिरमे, विकी उगले यांच्या सह अनेक मान्यवर माता भगिनी उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना सुनंदाताई पवार म्हणाल्या की, ज्या महिलांना शिलाई मशीन येते त्यांना प्रशिक्षण देऊन फॅशन डिझायनर चे प्रमाणपत्र देण्यात येईल त्या महिलांच्या गटाला जिल्हा परिषद शाळेचे गणवेश शिवण्याचे काम मिळेल सध्या महिलांना स्वतः च्या पायावर उभे करण्यासाठी आमच्या संस्थेमार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. त्याचा फायदा महिलांनी घ्यावा.
तसेच महिलांनी आपल्या घराची व अंगणाची स्वच्छता राखा जामखेड शहराला प्रथम क्रमांक आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिलांनी सहभाग घेतला त्या बद्दल महिलांचे आभार मानले. आयोजक फिरोज बागवान
शकिला बागवान व नाजमीन बागवान यांनी सर्व महिलांचे आभार मानले. खेळ पैठणीचा मध्ये प्रथम क्रमांक कुमुद मुळे, द्वितीय ज्योती साखरे यांनी पटकावले सर्व उपस्थित महिलांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष सरसमकर यांनी केले.