ट्रेलर मधून पवनचक्कीचे पाते पडल्यामुळे दोन जण ठार…

0
252

जामखेड न्युज – – – 

 नगर-मनमाडरोड वरील देहरे गावाच्या शिवारात एका भल्यामोठ्या ट्रेलर मधील पवनचक्कीच्या निर्मितीसाठी चालवलेले पाते अचानक त्या ठिकाणावरून जाणाऱ्या बोलेरोगाडी वर पडल्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
       खंडाळ्यातील रासकर कुटुंबीय देवदर्शनासाठी बोलेरो गाडीने निघाले होते.काल मध्यरात्री झालेल्या अपघातात रासकर परिवारातील सुशीला रासकर व शाम रासकर अशा दोघांचा मृत्यू झाला असून विलास रासकर व इतर रासकर कुटुंबातील सदस्य जखमी झाले आहेत. या घटनेमुळे श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here