शिक्षकांनी आदर्श भावी नागरिक घडवावेत-  गटविकास अधिकारी प्रकाश पोळ

0
244
जामखेड न्युज – – – – 
  आजचे विद्यार्थी भारताचे भावी नागरिक आहेत. हे आदर्श नागरिक घडविण्यासाठी व त्यांचा सर्वांगीण विकास हे उद्दिष्ठ ठेवून सर्व शिक्षकांनी काम करावे असे आवाहन केले. शिक्षकांचे प्रशासकीय प्रश्न हे लवकरात लवकर सोडवले जातील, आपण आपले कर्तव्य चोखपणे पार पाडावे असे आवाहन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यानी केले.
     महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळ तालुका जामखेड मार्फत नवनियुक्त अधिकारी व मुख्याध्यापक यांचा सत्कार समारंभ रविवार दिनांक 6 मार्च 2022 रोजी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक शाखा जामखेड येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास गट विकास अधिकारी माननीय प्रकाश पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात बोलताना मा. प्रकाश पोळ यांनी आपल्या समोर असणारे विद्यार्थी भारताचे भावी नागरिक आहेत. हे आदर्श नागरिक घडविण्यासाठी व त्यांचा सर्वांगीण विकास हे उद्दिष्ठ ठेवून सर्व शिक्षकांनी काम करावे असे आवाहन केले. शिक्षकांचे प्रशासकीय प्रश्न हे लवकरात लवकर सोडवले जातील, आपण आपले कर्तव्य चोखपणे पार पाडावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शाळांच्या  प्रलंबित लाईट बिल भरण्याची मागणी  करण्यात आली. मा. गटविकास अधिकारी यांनी लाईट बिल भरण्याची ग्वाही दिली. त्यांच्या भाषणातून विद्यार्थ्यांविषयी तळमळ दिसून आली. मा. गटशिक्षणाधिकारी श्री कैलास खैरे यांनी शिक्षकांनी प्रलंबीत प्रशासकीय  कामासाठी फोन करावा, सर्व शिक्षकांची प्रशासकीय कामे त्वरित निकाली काढण्यात येतील अशी ग्वाही दिली.
       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे माजी चेअरमन मा. श्री शरद भाऊ सुद्रिक हे उपस्थित होते. त्यांनी गेल्या सहा वर्षात संचालकांनी बँकेत केलेल्या प्रगतीची माहिती दिली व शिक्षकांचे प्रश्न उपस्थितांसमोर मांडले. शिक्षकांचे प्रलंबित मेडिकल बिले, वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव, सेवा पुस्तक नोंदी, उच्च शिक्षणास परवानगी हे प्रश्न निकाली काढल्याबद्दल गटविकास अधिकारी यांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमास संघटनेचे राज्य प्रतिनिधी श्री. किसन वराट व श्री. संतोष राऊत, विकास मंडळाचे विश्वस्त श्री गोकुळ गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष श्री विनोद सोनवणे, पदवीधर संघटनेचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष श्री मुकुंदराज सातपुते, महिला आघाडीच्या दक्षिण जिल्हाप्रमुख श्रीमती छाया जाधव, मुख्याध्यापक श्री गणपत चव्हाण, श्रीम. शोभा कांबळे हे उपस्थित होते.
          यावेळी नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी मा. श्री कैलास खैरे, नवनियुक्त शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्री.  दिगंबर पवार, केंद्रप्रमुख श्री. बाबासाहेब कुमटकर, नवनियुक्त मुख्याध्यापक  सर्वश्री नवनाथ बडे,  संतोष वांढरे,  रुपेश वाणी,  सुरेश मोहिते, केशव गायकवाड, अनिल आव्हाड, मोहन खवळे, विक्रम बडे, राजेंद्र मोहळकर, राम निकम, बाबुराव गिते, श्रीमती उर्मिला उगले यांचा फेटा, गुलाब पुष्प व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. तसेच देवदैठण येथील शिक्षक श्री. मनोज दळवी यांचा नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल, कुमार मयूर निगुडे याचा एमबीबीएस ला नंबर लागल्याबद्दल,  चि. शौर्य केशव हराळे जि. प. प्राथमिक शाळा पाडळी याने सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केल्याबद्दल,तर गुरुमाऊली मंडळाचे अभिमान विक्रम डोळे सर यांचा शाळेच्या उत्कृष्ट गुणवत्तेसाठी गुलाब पुष्प व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती जयश्री मुकणे यांनी आपल्या मातोश्री सौ. कृष्णाबाई दत्तात्रय मुकणे यांच्या स्मरणार्थ शिक्षक बँकेत दहा हजार रुपये ठेव ठेवून विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्याची योजना जाहीर केली व दहा हजार रुपयांचा चेक माजी चेअरमन व संचालक श्री शरद पवार सुद्रिक व श्री. राम निकम यांच्याकडे सुपूर्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष श्री पांडुरंग मोहळकर यांनी केले, तर सूत्रसंचालन तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. एकनाथ दादा चव्हाण यांनी केले. यावेळी गट शिक्षण अधिकारी मा. श्री कैलास खैरे, विस्ताराधिकारी श्री दिगंबर पवार, श्री. किसन वराट, श्री मुकुंदराज सातपुते, श्री. गोकुळ गायकवाड, श्री राम निकम, श्री केशव गायकवाड, श्री गणेश नेटके, श्री. विक्रम डोळे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा श्रीमती निशा कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार संतोषकुमार राऊत यांनी मानले. कार्यक्रमास जिल्हा पदाधिकारी श्री शहाजी जगताप, श्री सुनील कुमटकर, श्री विकास बगाडे, श्री विक्रम डोळे, श्री राजेंद्र मोहळकर, तालुका उच्चाधिकार समितीचे पदाधिकारी मा. दिगंबर पवार, श्री माजिद शेख, श्रीहरी साबळे, श्री रामदास गंभीरे, श्री संभाजी कोकाटे, श्री जालिंदर भोगल, श्री दत्तात्रय यादव, तालुका पदाधिकारी सर्वश्री रामहरी बांगर, गणेश नेटके, राजीव मडके, बाळासाहेब जरांडे, अर्जुन पवार, धीरजकुमार उदमले, मोहन खवळे, केशव हराळे, बापूसाहेब कोळी, सचिन पवार, श्रीमती कल्पना गायकवाड, श्रीमती कल्पना ससाणे व तालुक्यातील शिक्षक सर्वश्री दत्ता होनमाने, संतोष ससाणे, अतुल मुंजाळ, प्रमोद कचरे, बबन बारगजे, विकास सोनवणे, विठ्ठल जाधव, ज्ञानेश्वर कौले, व्यंकटेश कुलकर्णी, प्रमोद जोशी, अनिलकुमार भोसले, संदीप लबडे, राजाभाऊ राठोड, सिताराम निगुडे, सुशेन चेंटमपल्ले, संतराम शेळके, संतोष लगड, जालिंदर यादव, बर्डे सर नागोबाचीवाडी, बांबळे सर, गवळी सर, कचरे सर, बबनराव बारगजे सर, वाघ सर बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here