जामखेड प्रतिनिधी
नगर जिल्हा सहकारी बँकेच्या सेवा संस्थेच्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विद्यमान संचालक जगन्नाथ राळेभात यांना तिकीट दिले होते तर राष्ट्रवादीने सुरेश भोसले यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या
उमेदवाराला सुचक मिळाला नाही. राळेभात यांचा मुलगा अमोल राळेभात यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या अर्जावर एकच सुचक होता. ज्यांच्या पक्षाला सुचक मिळाला नाही त्या पक्षाची अवस्था काय होती हे यावरून स्पष्ट होते छाननीत राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्ज बाद झाला असताना आ. रोहीत पवार यांनी राजकीय दबाव आणून तो मंजूर करून घेतला त्यामुळे आमच्या उमेदवारावर पडणारा गुलाल काही दिवस लांबला. निवडणूक झाली तर दारून पराभव होईल या भीतीने आ. रोहीत पवार यांनी आपल्या उमेदवाराचा अर्ज माघे घेतला हा त्यांचा नैतिक पराभव असून त्याची आता सुरवात झाली आहे असे माजी मंत्री व प्रदेशउपाध्यक्ष प्रा. राम शिंदे म्हणाले.