जामखेड प्रतिनिधी
जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत जामखेड विविध सेवा मतदार संघातून जगन्नाथ राळेभात बिनविरोध झाले आहेत. जिल्हा बँकेसाठी विकास सेवा संस्था मतदार संघातून राळेभात यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुरेश भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज भोसले यांनी मागे घेतला. त्यामुळे राळेभात बिनविरोध झाले आहेत. याआधी जिल्हा बँकेवर माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के तसेच माजी आ.चंद्रशेखर घुले यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
यावेळी जामखेड न्युजशी बोलताना राळेभात म्हणाले की, सर्वाच्या सहकार्याने बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल सर्वाचे आभार मानले तसेच राधाकृष्ण विखे पाटील हे आमचे नेते आहेत त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही काम करणार आहोत. आम्हाला माजी मंत्री प्रा राम शिंदे व आमदार रोहित पवार यांचेही सहकार्य लाभले असे ते म्हणाले.
राळेभात हे गेल्या 25 वर्षापासुन जिल्हा बॅंकेचे जामखेड तालुक्याचे प्रतिनिधीत्व करत आहेत. जामखेड मध्ये 47 मतदार होते बहुतेक सर्वच मतदार राळेभात यांच्या बरोबर होते.
यांच्या बिनविरोध निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या निवडीबद्दल माजी मंत्री प्रा. राम शिंदे, पांडुरंग सोले पाटील, प्रा. अरूण वराट सर, सुधीर राळेभात, किसनराव ढवळे, दादाहरी थोरात, अंकुशराव ढवळे, तुषार पवार, अमृत पाटील, लहू शिंदे, पांडुरंग उबाळे, फुंदे यांच्या सह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.