जगातील सर्वात शक्तीवर्धक व औषधी भाजी!!!

0
295
जामखेड न्युज – – – – 
हिरव्या भाज्यांचे सेवन केल्याने अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात असे तज्ज्ञ सांगतात. परंतु हिरव्या भाज्यांमध्ये अशा अनेक भाज्या आहेत. ज्या खाल्ल्याने तुमचे शरीर निरोगी राहते. अशीच एक भाजी म्हणजे कर्टुले होय. ही जगातील सर्वात शक्तिवर्धक तसेच औषधी भाजी आहे.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि कॅन्सर सारख्या आजारांपासून दूर राहायचे असेल तर आजपासूनच कर्टुले खाण्यास सुरुवात करा. ते खाल्ल्याने कर्करोगाचा धोकाही कमी होतो.
कर्टुल्याची लागवड जगभर 
आरोग्याच्या दृष्टीने कर्टुल्याचे अनेक  फायदे आहेत. त्यामुळे त्याची लागवड जगभरात होते. याची लागवड प्रामुख्याने भारतातील डोंगराळ भागात केली जाते.
कर्टुलांमध्ये मांसापेक्षा 50 पट जास्त प्रथिने 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्टुल्यांमध्ये मांसापेक्षा 50 पट अधिक ताकद आणि प्रोटीन असते. कर्टुल्याच्या भाजीमध्ये असलेले फायटोकेमिकल्स आरोग्याला निरोगी ठेवण्यास खूप मदत करतात.
कर्टुले हा भाजीचा राजा
कर्टुले हा भाजीचा राजा आहे. या भाजीची चव कडू असली तरी नियमितपणे खाल्ल्यास तुम्हाला अनेक मोठे फायदे मिळतील.
फक्त काही दिवस खा, फरक दिसेल
तुम्ही काही दिवस कर्टुले खायला सुरुवात करा. यामुळे तुम्हाला दोन दिवसात फरक दिसेल. त्यामुळे आजच तुमच्या आहारात याचा समावेश करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here