जामखेड न्युज – – –
चार जिल्ह्याच्या सरहद्दीवर तसेच मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या जामखेड शहराची बाजारपेठ चांगली आहे. अत्याधुनिक प्रणाली व पारदर्शक व्यवहार केल्यास लोकांना योग्य सेवा दिल्यास विश्वास संपादन करता येतो. हे सर्व समता पतसंस्थेने केले आहे या पतसंस्थेमुळे जामखेडच्या वैभवात नक्कीच भर पडेल असा विश्वास बारामती अॅग्रोच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी व्यक्त केला.
समता पतसंस्थेच्या जामखेड शाखेचे उद्घाटन समारंभ बुधवार दि. २३ रोजी बारामती अॅग्रोच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांच्या शुभहस्ते आज संपन्न झाला. याप्रसंगी समताचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, सुहासिनीताई कोयटे, जेष्ठ नेते राजेंद्र कोठारी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, जिल्हा उपाध्यक्ष, सुरेश भोसले, अशोक शिंगवी, अजीनाथ हजारे, रमेश गुगळे, अरुण चिंतामणी, विनायक राऊत, रामचंद्र राळेभात, भानुदास बोराडे, महेश नगरे, दिगंबर चव्हाण, मधुकर लोहकरे, राहुल लोहकरे, प्रदीप शेटे, अमोल लोहकरे, आदी विविध पतसंस्थांचे अध्यक्ष, मान्यवर, नागरिक , व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुनंदाताई पवार म्हणाल्या की, नेहमी कुठल्याही संस्थेत किंवा पतसंस्थेत / बँकेत गेल्यानंतर तिथली स्वच्छता , निटनेटकेपणा , व्यवस्थापन , पहिला परिणाम होत असतो. निटनेटकेपणा व टेक्नालॉजी चा उत्तम वापर या संस्थेने केल्यामुळे संपूर्ण व्यवहारा मध्ये ट्रान्सफरन्सी आली. टेक्नालॉजी मुळे व्यवहारामध्ये पारदर्शकता शक्य झाली . या पतसंस्थेने महिलांना मोठा सपोर्ट दिला आहे . तसेच प्रॉडक्शन मार्किटिंगसाठी सपोर्ट केला . ” तुम्ही आले आहात काका ” . तुमच्या सहकार्याने जामखेड येथे सहकार दालन सुरु केले असून तुमचा सपोर्ट असेल तर , जामखेड आणि परिसर मध्ये काम करणाऱ्या माहिला बचत त्यांच्या विक्रीच दालन सर्वांच्या उपस्थित सुरु करणार आहोत. असे प्रतिपादन सौ.सुनंदाताई पवार यांनी केले.
पयावेळी समताचे पतसंस्थेचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे प्रस्ताविकात म्हणाले की, गेल्या ३५ वर्षापासून संस्थेचे काम सुरु असताना पारदर्शक कारभारामुळे ठेवी, सोनेतारण तसेच पंतस्थेचा विस्तार व लोकांचे प्रेम संपादन करु शकलो. आत्याधुनिक प्रणाली व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार केला. आपल्या मध्ये “ कॉम्पिटेशन नाही, आपले मधले हेवे- दावे नाही. ” हेल्दी कॉम्पिटेशन करायचे आहे.जामखेडकरांच्या चांगल्या सेवेसाठी तसेच ” बँकीग व पतसंस्थे चळवळी वरचा विश्वास यापुढे वाढविण्या करता एकमेंका च्या हातात हात घालून काम करुया.
यावेळी जेष्ठ नेते राजेंद्र कोठारी, उद्योगपति रमेश गुगळे, अशोक शिंगवी यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संदिप कोयटे तर आभार सचिन भट्टड यांनी मानले .