जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
जामखेड नगरपरिषद हद्दीत पंतप्रधान आवास योजने अंतर्गत वैयक्तीक स्वरुपायी घरबांधणी योजने अंतर्गत नऊशे ते साडेनऊशे घरकुल मंजुर झाले होते त्यातील
दोनशे ते अडीशे घरकुलाचे बांधकाम पुर्णकाम सबंधित लार्भात्याचे बांधकाम पुर्ण होऊन एक ते दीड वर्ष झाले आहे.पण त्यांचे अतिम हप्ता त्यांना मिळाला नाही वेळोवेळी
तोंडी स्वरुपाचा पाठपुरावा करुन देखील संबंधित लार्भात्यांचे बिल आदा झाले नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे पंधरा दिवसांत बील मिळावे अन्यथा नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मा. नगरसेवक गणेश आजबे यांनी दिला आहे.
यावेळी अशोक नेटके, बाप्पू आजबे, अनिल नेटके, सुधाकर नेटके,दत्तू आजबे, बुवासाहेब वीर,लक्ष्मण राळेभात, राजू आजबे, उद्धव वीर उपस्थित होते.
पंतप्रधान आवास योजने अंतर्गत वैयक्तीक स्वरुपायी घरबांधणी योजने अंतर्गत नऊशे ते साडेनऊशे घरकुल मंजुर झाले होते त्यातीलदोनशे ते अडीशे घरकुलाचे पुर्णकाम बांधकाम पुर्णकाम बांधकाम सबंधित लार्भात्याचे बांधकाम पुर्ण होऊन एक ते दीड वर्ष झाले आहे.पण त्यांचे अतिम हप्ता त्यांना मिळाला नाही वेळोवेळी तोंडी स्वरुपाचा पाठपुरावा करुन देखील संबंधित लार्भात्यांचे बिल आदा झाले नाही. संबंधित लाभार्थी हे गरीब वर्गातील असुन त्यांना खाजगी सावकार मार्फत पैसे घेऊन घर पुर्ण केले आहेत.तरी मुख्याधिकारी यांना विनंती करतो की पंधरा दिवसाच्या आत संबधित लार्भात्याचे देयक आदा करावे (शेवटचा हप्ता) अन्यथा पंधरा दिवसा नंतर आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असुन संबंधीत जबाबदारी प्रशासनाची असेल. असे गणेश आजबे यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे.
निवेदनाच्या प्रती
१) मा.जिल्हाधिकारी साहेब,अहमदनगर
२) मा.खा.सुजय (दादा) विखे पाटील (खासदार नगर-दक्षिण)
३) मा.आ.रोहित (दादा) पवार साहेब,आमदार कर्जत-जामखेड
४) मा.राम शिंदे साहेब,(मा.आमदार तथा मा.पालकमंत्री)
५) मा.तहसिल कार्यालय,जामखेड
६) मा.पोलिस निरीक्षक साहेब,जामखेड
यांना पाठवले आहेत.