जामखेड न्युज – – – –
कर्जत-जामखेड मतदारसंघातील अनेक गरजू लोकांचे डोळ्यांच्या आॅपरेशन सह इतरही शस्त्रक्रिया अगदी सर्व सुखसोयींनी युक्त मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत त्यामुळे गावागावातून आमदार असावा तर रोहित दादांसारखा अशी भावना व्यक्त केल्या जात आहेत व आमदार साहेबांचे आभार मानले जात आहे.
ADVERTISEMENT 

KJIDF च्या माध्यमातून पिंपरी चिंचवडच्या डॉ.डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये कर्जत जामखेड मतदारसंघातील अनेक रुग्णांवर डोळ्यांच्या ऑपरेशनसह इतरही ऑपरेशन मोफत करून दिले आहेत. त्यात
माझ्या बावी गावातील काही गोर गरीब लोकांचे मोफ़त ऑपरेशन करून दिले आम्ही त्या लोकांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितले एकदम मस्त सोय व घरातील माणसं असल्या सारखी आमची व्यवस्था केली होती आणि रोहित दादा हे देवाच्या रूपाने आमच्या मदतीला धावून आले
माझ्या गावतील लोकांना मोफ़त ऑपरेशन करून दिल्या बदल बावीचे सरपंच निलेश पवार यांनी आमदार रोहित पवारांचे आभार मानले आहेत
जामखेड न्युजशी बोलताना सरपंच निलेश पवार म्हणाले की, मी निलेश पवार सरपंच बावी ग्रामपंचायत च्या वतीने आमदार रोहित दादा पवार यांचे खूप खूप आभार मानतो तसेच त्याच्या कडून यापुढेही अशीच गोर गरीब लोकांच्या सहकार्याबद्दल अपेक्षा व्यक्त करतो…
खूप खूप आभार दादा तुमचे
ग्रेट वर्क दादा…
ग्रेट वर्क दादा…
निलेश पवार सरपंच बावी