राज्यात पुन्हा बसरणार पाऊस…हवामान खात्याचा अंदाज

0
216
जामखेड न्युज – – – – 
आता उत्तरेत पावसानं उसंत घेतली असून थंडीचा कडाका देखील कमी झाला आहे. पण सध्या दक्षिण भारतात ईशान्यकडील वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे दक्षिण तामिळनाडू, पाँडेचेरी, कराईकल, दक्षिण केरळ, माहे परिसरात पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. येत्या चोवीस तासांत दक्षिण तामिळनाडू आणि दक्षिण केरळात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तापमानात वाढ होण्याची शक्यता
महाराष्ट्रात इतर ठिकाणी देखील थंडीचा जोर ओसरला असून किमान तापमानात वाढ झाली आहे. आज महाबळेश्वर येथे 14.6, सातारा 14.7, सोलापूर 15.5, कोल्हापूर 18.1 सांगली 16.7, जळगाव 10, मालेगाव 11, पुणे 13.3, बारामती 12.4, नाशिक 11.7, परभणी 13.6, जालना 14.3, उस्मानाबाद 14, चिखलठाणा 12, नांदेड 13.4, मुंबई 19, डहाणू 17.9, ठाणे 20, माथेरान 18.6, हरनाई 21.8 आणि रत्नागिरीत 19.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. याव्यतिरिक्त, येत्या 4 दिवसात वायव्येकडील बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील 4-5 दिवसांत मध्य भारतातील बहुतांशी भागांमध्ये किमान तापमानात 3 ते 5 अंशाने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात वायव्य आणि मध्य भारतात थंडीचा जोर कमी होणार आहे.
पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट
संबंधित राज्यात आज अनेक ठिकाणी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. काही प्रमाणात याचा परिणाम महाराष्ट्रावर देखील होणार आहे. पुढील दोन दिवस राज्यात कोरडं हवामान राहिल्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार आहे. 15 फेब्रुवारी रोजी हवामान खात्याने नागपूरसह, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. यादिवशी संबंधित जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहेत. मागील दोन दिवसांपासून विदर्भात किमान आणि कमाल तापमानात किंचित वाढ झाली असून उकाडा वाढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here