जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये बऱ्याच प्रमाणात भौतिक सुविधेचा अभाव आहे.त्यामध्ये प्रामुख्याने शालेय इमारती यांच्या समावेश आहे. शाळा इमारतीचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल असे आश्वासन दिले राज्याचे नूतन प्राथमिक शिक्षण संचालक मा. दिनकरराव टेमकर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचपूर ता.आष्टी जि.बीड या ठिकाणी बोलताना दिले.
राज्याच्या शिक्षण संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शाळेत आयोजित केला होता. यावेळी साहेबांनी शाळा राबवत असलेल्या उपक्रम माझी शाळा सुंदर शाळा, शालेय परिसर स्वच्छता बोलक्या भिती हँन्डवाँश स्टेशन, वृक्षारोपणात विविध वृक्षांची रेलचेल यात अटल धनवन ,ग्रंथालय, सुंदर माझे कार्यालय या बाबींची पाहणी केली व सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले.
तसेचशाळेने मोकळ्या जागेत पेरलेल्या हरभरा पिकाची पाहणी करून त्याचा आस्वाद देखील घेतला व यावेळी पंचायत समिती आष्टीचे गटशिक्षणाधिकारी श्री.यादव साहेब, चिंचपूर शाळेचे मुख्याध्यापक तथा स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन श्री.पठाडे सर, श्री.पठाडे आबा सर केंद्रीय मुख्याध्यापक मातकुळी ,श्री.होगाडे सर,श्री.भापकर सर,श्री.मोरे सर,श्री.सोनवणे सर,श्री.काळे सर,श्री.चौधरी सर शाळेतील सर्व शिक्षक जगताप सर,आष्टेकर सर, आडाले मँडम, माळवे मँडम, सोळसे मँडम या प्रसंगी उपस्थित होते. सर्वांचे आभार चिंचपूर शाळेचे मुख्याध्यापक श्री.पठाडे सर यांनी मानले.