सहकार विभागाची आदर्श प्रतिमा निर्माण करणारे कार्यतत्पर अधिकारी सहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर खाजगी सावकारकीचा बिमोड, सेवा संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य खातेदारांना कर्जपुरवठा, प्रशासक काळात बाजार समिती नफ्यात, पसा पध्दत बंद

0
249
जामखेड प्रतिनिधी 
                   जामखेड न्युज – – – (सुदाम वराट) 
     जामखेडचे सहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर यांनी
तालुक्यातील खाजगी सावकाराविरोधात धाडी टाकून गुन्हे दाखल करत खाजगी सावकारकीचा बिमोड केला. महात्मा फुले कर्जमाफी योजना प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी दिव्यांग व वृद्ध व्यक्तींच्या घरी जाऊन लाभ दिला. सेवा संस्थेमार्फत तालुक्यातील सर्व सामान्य शेतकर्‍यांना कर्जपुरवठा होण्यासाठी त्यातील अडचणी दूर केल्या तसेच तोट्यात असणारी बाजार समिती नफ्यात आणली शेतकर्‍यांची लुट करणारी पसा पध्दत बंद केली असे अनेक आदर्श कामे करत सहकार विभागाची आदर्श प्रतिमा निर्माण केली
     खाजगी सावकाराविरोधात कारवाई
      जामखेड तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर खाजगी सावकारकी बोकाळलेली होती सर्व सामान्य नागरीकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होत होती पोलीस स्टेशनच्या मदतीने तसेच सहकार विभागामार्फत खाजगी सावकाराविरोधात धाडी टाकल्या गुन्हे दाखल केले यामुळे तालुक्यात खाजगी सावकारी मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात यश मिळविले.
     शासनाची महात्मा फुले कर्जमुक्ती योजना प्रभावीपणे राबविली.
   शासनाची महात्मा फुले कर्जमुक्ती योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी दिव्यांग वयोवृद्ध व्यक्तीच्या घरी जाऊन अगदी शेवटच्या घटकांपर्यंत  कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून दिला. तसेच तालुक्यातील अनेक सेवा संस्थेत सर्वसामान्य शेतकर्‍यांना कर्ज मिळवण्यासाठी अडचण येत होती ती विचारविनिमयाने सोडवत सेवा संस्थेच्या माध्यमातून तालुक्यात प्रभावीपणे योजना राबवली
       तोट्यात असणारी संस्था नफ्यात आणली
     कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदी देवीदास घोडेचोर यांची नियुक्ती होताच तोट्यात असलेली बाजार समिती सहा महिन्यात विक्रमी उत्पन्न होऊन सव्वा कोटी नफ्यात आली यासाठी त्यांनी अनावश्यक खर्चाला फाटा, बाजार समितीच्या आवाराबाहेर होणाऱ्या खरेदीवर भरारी पथक नियुक्त करून सेस वसुली व शेतकऱ्यांची नुकसान करणारी पसा पध्दत बंद केली यामुळे तोट्यातील बाजार समिती सहा महिन्यात ( अर्थीक वर्ष २०२०-२१) सव्वा कोटी नफ्यात आली आहे.
          मागील सत्ताधाऱ्यांची मुदत १५ सप्टेंबर २०२० रोजी संपल्यानंतर दुसर्‍याच दिवशी प्रशासक म्हणून येथील सहाय्यक निबंधक ( सहकार) यांनी पदभार घेताच कठोर नियमावली राबवून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले. संचालक मंडळ सत्तेत असताना होणारा अनावश्यक खर्चाला पूर्ण फाटा दिला चहा व्यतिरिक्त कोणताच खर्च नाही. बाजार समितीचा उत्पन्नाचे मुख्य स्तोत्र म्हणजे व्यापा-यांनी शेतकऱ्यांचा खरेदी केलेल्या मालावर असणारा सेस हा वाढवण्यासाठी प्रशासक देवीदास घोडेचोर यांनी प्रयत्न केले तसेच आठवडे बाजार उत्पन्न व गाळेधारकांकडून थकीत वसुली आदी बाबीवर लक्ष केंद्रित केले.
     बाजार समितीच्या आवाराबाहेर शहर व तालुक्यात शेतकऱ्यांचा माल काही आडत व्यावसायिक खरेदी करीत होते पण त्याचा सेस भरला जात नव्हता. त्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती प्रशासकाने करून जे आडत व्यापारी म्हणून व्यवसाय करणाऱ्या वर शेतकऱ्यांचा माल खरेदी केलेली नोंदी तपासणी करून त्यांच्याकडून बुडीत सेस वसुल केला यामुळे बाजार समितीचे सहा महिन्यात २ कोटी ३६ लाख उत्पन्न झाले व बाजार समितीने तोटा भरून काढून व इतर देणी व कर अदा करून १ कोटी १८ लाख नफ्यात आली.
            पसा पध्दत बंद केली
प्रशासक घोडेचोर यांनी बाजार समितीत चालणारी पसा पध्दत बंद केली. पसा म्हणजे शेतमाल व्यापारी अडतीवर आल्यावर शेतमाल उतरून घेणे, पोत्यात भरणे, बारदाणा व्यवस्थित ठेवणारे खाजगी मजुर या कामाच्या बदल्यात एक ते दोन किलो धान्य पोत्यामागे काढून घेत होते. ही पध्दत म्हणजे पसा पध्दत होय या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते ही पसा पध्दत बंद करण्याचे धाडस प्रशासकाने करून शेतकऱ्यांना न्याय दिला.
        अशा प्रकारे तीन वर्षांच्या काळात अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेत त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत शेतकरी वर्गात एक आदर्श प्रतिमा निर्माण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here