Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या आजी – माजी सैनिकांनी कामासाठी थेट संपर्क साधावा – तहसीलदार योगेश चंद्रे

आजी – माजी सैनिकांनी कामासाठी थेट संपर्क साधावा – तहसीलदार योगेश चंद्रे

0
574
जामखेड प्रतिनिधी 
                जामखेड न्युज – – – – – 
      देशासेवेचे व्रत स्विकारलेले व अभिमान असणाऱ्या सैन्य दलातील आजी माजी जवनांच्या सेवेसाठी तहसीलदार योगेश चंद्रे यांनी वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. अंतर्गत त्यांनी तहसील कार्यालय व महसूल विभागाशी संबंधित कोणतेही काम असेल तर माझ्याशी थेट संपर्क करावा असा फलकच जामखेड तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावला आहे.
         आपल्या अनोख्या कार्यपद्धतीमुळे एक कार्यकुशल व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून अल्पावधीतच परिचीत झालेले जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आपल्या देशासाठी हजारो मिटर उंचीवर व निचांकी तपमानातही आपले कर्तव्य  बजाविणाऱ्या सैन्य दलातील आजी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांची स्थानिक पातळीवर शासकीय कामकाज करताना हेळसांड झाल्याचे पहायला मिळते. भारतीय सैन्य दलातील जवान व त्याच्या कुटुंबीयांना कामानिमित्त तहसील कार्यालयात हेलपाटे घालावे लागत असून नाहक त्रासला सामोरे जावे लागत होते. ही बाब तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या लक्षात आली. त्यांनी जवानाच्या शासकीय कामाला प्राधान्य देण्याचे ठरविले.
याच पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय व महसूल विभागाशी संबंधित कोणतेही काम असेल तर माझ्याशी थेट संपर्क करावा असा फलकच जामखेड तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावला आहे.
यामुळे आजी माजी सैनिकांच्या वतीने शिवनेरी अकॅडमीचे संचालक सेवा निवृत्त कॅप्टन लक्ष्मणराव भोरे, प्रहार सैनिक कल्याण संघाचे अध्यक्ष कांतीलाल कवादे आदिंनी तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!