जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष पदी कल्याणी एन्टरप्रायझेचे संचालक प्रा.कुंडल राळेभात यांची निवड करण्यात आली.संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अहमनगरचे निरिक्षक शरद चव्हाण यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.याप्रसंगी मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक प्रा.मधुकर (आबा ) राळेभात,संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष अवधूत पवार,माजी तालुकाध्यक्ष संभाजीराजे ढोले,प्रा.लक्ष्मण ढेपे, नगरसेवक राजू भैय्या जाधव,आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा.कुंडल राळेभात म्हणाले की,नवी दिशा,नवा विचार ही भूमिका घेत म.से.सं. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीण दादा गायकवाड यांनी मराठा कम्युनिटी ही “बिझनेस कम्युनिटी” म्हणून ओळखले गेली पाहिजे या जाणिवेतून नवतरुणांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी उद्युक्त करण्याचे अत्यंत महत्वपूर्ण कार्य सुरू केलेले आहे.
अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा या घोषवाक्याद्वारे बहुजनांच्या मुलांना अवघा मुलूख आपूला हे पटवून देण्यासाठी, उर्जा देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी बिझनेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचे कार्य हाती घेतलेले आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक तरुण उद्योग, व्यवसाय करण्यासाठी सरसावले आहेत. समाजाला “आर्थिक साक्षर” करण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे आणि निश्चितच याचा कळस हे तरुण गाठतील यात तिळमात्र शंका नाही.लवकरच जामखेड येथे देखील बिझनेस काॅन्फरन्सचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले..
सदर निवडीबद्दल प्रहारचे प्रदेश उपाध्यक्ष, उद्योजक संतोष पवार,विश्वदर्शन न्युजचे गुलाबशेठ जांभळे,बामसेफचे जिल्हाध्यक्ष नामदेव राळेभात, राजर्षी शाहू महाराज पतसंस्थेचे चेअरमन भानुदास बाप्पू बोराटे,खलिल मौलाना, जावेदभाई सय्यद,प्राचार्य विकी घायतडक,प्रा.राहुल आहेर यांनी अभिनंदन केले.