जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – –
लोकप्रिय आमदार रोहित (दादा) पवार यांचे खंदे समर्थक व विश्वासू हनुमंत पाटील यांच्या निवासस्थानी हनुमंत पाटील मित्रमंडळाच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता यासाठी गावातील महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
हळदी-कुंकू कार्यक्रमासाठी जामखेड पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे, त्यांच्या कन्या डॉ. स्नेहा मोरे, महिला व बालकल्याण अधिकारी ज्योती बेल्हेकर, सरपंच मनिषा पाटील, धनश्री पाटील, प्रतिक्षा पाटील यांच्या सह साकत परिसरातील सुमारे २५० ते ३०० महिला उपस्थित होत्या.
लोकप्रिय आमदार रोहित (दादा) पवारांचे खंदे समर्थक व विश्वासू हनुमंत पाटील यांनी मित्रमंडळाच्या वतीने आपल्या निवासस्थानी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता यासाठी परिसरातील मोठ्या प्रमाणावर महिला उपस्थित होत्या सर्व महिलांना तिळगुळ व संसार उपयोगी वाणाचे वाटप करण्यात आले तसेच सर्वाच्या अल्पोपाहाराची सोय करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे कौतुक सर्व स्तरातून करण्यात आले.