जामखेड प्रतिनिधी
25 जानेवारी हा मतदान जागृती दिनानिमित्त तहसील कार्यालयाच्या वतीने ल.ना. होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मतदान जागृती दिन साजरा करण्यात आला. मतदार जागृती दिनानिमित्त यावेळी नायब तहसीलदार जायकर साहेब यांनी मतदार जागृती दिनाचे महत्त्व व कार्य याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीकांत होशिंग होते. तसेच यावेळी मतदार जागृती दिनाच्या निमित्ताने सकाळच्या सत्रात चित्रकला, निबंध,रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर लगेचच कार्यक्रमाअंती बक्षीस वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांबरोबर बाळासाहेब पारखे व मुकुंद राऊत कलाशिक्षक यांचाही सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी बी एल ओ यांचे कार्य कौतुकास्पद असून आपले कार्य सांभाळून त्यांनी केलेले हे प्रामाणिकपणाचे व कौतुकास्पद आहे. विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी योग शिक्षक बाळासाहेब पारखे यांनी सर्वांकडून शपथ म्हणून घेतली व मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समारंभ प्रमुख संजय कदम यांनी तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक रमेश अडसूळ यांनी केले.त्यावेळी विद्यार्थी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समारंभ प्रमुख संजय कदम, मुकुंद राऊत, बाळासाहेब पारखे, राघवेंद्र धनलगडे, विशाल पोले, यांनी काम पाहिले यावेळी पी टी गायकवाड , एस एन वायकर, ईश्वर कोळी ,अनिल होशिंग, घोडेस्वार रोहित, सुभाष बोराटे,अर्जुन रासकर, भागवत सुपेकर ,हनुमंत शिरसागर विजय, साईप्रसाद भोसले,अविनाश नवगिरे यांनी केले. श्रीमती संगीता दराडे,सुप्रिया घायतडक, भालेराव मॅडम उपस्थित होते.तागड,श्रीमती राक्षे मॅडम, आडाले निलेश,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
चौकट
तालुक्यातील विविध विद्यालयामध्ये मतदार जागृती दिन साजरा करण्यात आला श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यानंतर मुख्याध्यापक दत्तात्रय काळे यांनी मतदार व लोकशाही विषयी माहिती दिली तर समारंभ प्रमुख सुदाम वराट यांनी आभार मानले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.