जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माॅ साहेब व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे भव्य रक्तदानाचे शिबीर आयोजित करण्यात आले होते यात १४१ युवकांनी रक्तदान करत स्वराज्यजननी जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंदाप्रती आदरांजली अर्पण केली आहे. रक्तदान शिबीराचे उद्घाटन महिलांच्या हस्ते करण्यात आले.

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमासाहेबांचा जन्मदिन या मातेचा महाराष्ट्रात जन्म झाला आणि खऱ्या अर्थाने या देशात सुवर्ण पहाट झाली. या माऊलीने शिवबा सारखा नवरत्न जन्मालाच घातला नाही तर स्वराज्य स्थापना करून रयतेचे राज्य उभे केले. या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती निमित्ताने जामखेड येथे नुकतेच स्वाभिमानी शेतकरी पक्ष व संघटना जामखेड यांच्या वतीने भव्य असे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख मंगेश आजबे यांनी केले होते. यावेळी १४१ रक्तपिशव्याचे संकलन झाले
ADVERTISEMENT 

कार्यक्रमाची सुरुवात महीलांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली. महिलांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. व महिलांनी रक्तदान स्वतः करून सुरुवात केली.
यावेळी महीलां भिमाबाई राजाभाऊ मुळे, सविता बाळु मुळे, प्रियंका बुवासाहेब मुळे, जनाबाई मुळे, मंगल मुळे, सुनिता रमेश मुळे, सुशिला बाळु मुळे, रोहीणी श्रीराम मुळे, सुनिता पांचग्रे, मंगल सुंदरदास बिरंगळ, दिपाली मंगेश आजबे, निलम पवन उगले, अंजली बालाजी आजबे, कल्पना जसाभाटी, आरती राळेभात, पुनम घोडेस्वार, पूजा पवार , शितल नागरगोजे, सविता आजबे, कल्पना परकाळे, संध्या परकाळे सह अनेक महीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.









