Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या देशात पुन्हा लॉकडाउन लागणार?; पंतप्रधान मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर आज दुपारी बैठक

देशात पुन्हा लॉकडाउन लागणार?; पंतप्रधान मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर आज दुपारी बैठक

0
310
जामखेड न्युज – – – 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करोना परिस्थिचा आढावा घेण्यासाठी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक करणार आहेत. आज दुपारी ऑनलाइन माध्यमातून ही बैठक होणार आहे. राज्यांमधील लसीकरण वाढवण्यासाठी आणखी लससाठी मिळावा आणि इतर औषधांबाबत यावेळी राज्यांकडून मागणी केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून केंद्र सरकार सुद्धा लसीकरणासंदर्भातील काही निर्देश देणार असल्याची तसेच निर्बंधांबद्दल या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीमध्ये पुन्हा निर्बंध कठोर करण्याबरोबरच देशभरामध्ये लॉकडाउन लावण्याच्या शक्यतेबद्दलही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
                         ADVERTISEMENT 
या राज्यांमुळे वाढली चिंता
पंतप्रधान मोदी आज दुपारी साडेचारच्या सुमारास सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. १९ राज्यांमध्ये १० हजारहून अधिक ओमायक्रॉन करोना रुग्ण असून महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरात या राज्यांमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी बुधवारी दिलीय.
उच्च स्तरीय बैठकीत मोदींनी दिलेले हे सल्ले
रविवारी झालेल्या एका उच्च स्तरीय बैठकीमध्ये १५ ते १८ वयोगटातील मुलांमधील लसीकरण वेगाने करण्यासंदर्भातील निर्देश पंतप्रधानांनी दिले होते. तसेच जिल्हा स्तरावर आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत असंही मोदी या बैठकी म्हणाले होते. २०२० पासून पंतप्रधानांनी वेळोवेळी अशापद्धतीने मुख्यमंत्र्यांसोबत करोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकी घेतल्या आहेत.
लॉकडाउनसंदर्भात निर्णयाची शक्यता
सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या या बैठकीमधील केंद्र सरकारकडून कठोर निर्बंधांबद्दल चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. निर्बंध कठोर करण्यासंदर्भात चर्चा करुन त्याबद्दल महत्वाचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत घेतला जाईल असं म्हटलं जात आहे. या बैठकीमध्ये लॉकडाउनसंदर्भात विचार केली जाऊ शकतो अशीही चर्चा आहे. मात्र यासंदर्भातील अंतिम निर्णय पंतप्रधानच घेतील असा दावा केला जातोय.
अधिक संसर्ग असणाऱ्या राज्यांसाठी वेगळे नियम?
दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमध्ये करोना रुग्णसंख्येमध्ये पुन्हा मोठी वाढ दिसून येत असल्याने करोना रुग्णसंख्या वाढणारी राज्ये आणि इतर राज्ये असे वेगळेवेगळे नियम लावण्यासंदर्भातील शक्यताही व्यक्त केली जातेय.
कोणत्या विषयांवर होणार चर्चा?
या बैठकीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा, व्हेंटिलेटर्सची संख्या, आयसीयू बेड्सची संख्या, पीएसए यंत्रणा, ऑक्सिजन बेड्स, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या, लसीकरणाची सद्यस्थिती यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जातं आहे. तसेच ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भविष्यातील वाटचाल कशी असावी याबद्दलही सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!