जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषद मार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२१, माझी वसुंधरा अभियान व प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन जामखेड नगरपरिषदे मार्फत
करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख पाहुणे सुनंदाताई पवार यांच्या हस्ते प्लास्टिक कचरा संकलन गाडीचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास जामखेड मधील शैक्षणिक संस्था ल. ना. होशिंग विद्यालय, नागेश विद्यालय, जामखेड महाविद्यालय या सर्व शैक्षणीक संस्थाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व विध्यार्थी यांची उपस्थिती होती व प्लास्टिक संकलन कामात सहभाग घेतले या बाबत जामखेड नगरपरिषद मार्फत सर्वांचे सत्कार करण्यात आले. तसेच जामखेड नगरपरिषद अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे ओल्या कच-यापासून तयार केलेले कंपोस्ट खतांच्या विक्री केंद्राचे उद्घाटन प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानुसार कंपोस्ट खताची विक्री नगरपरिषद मार्फत करण्यात येणार आहे. तसेच नगरपरिषद मार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सदर कार्यक्रम नगराध्यक्ष निखील घायतडक यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला.

लाभार्थीच्या घरकुल सुरु करण्याच्या अडचणी समजून घेऊन त्यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच घरकुल पूर्ण लाभार्थी यांचे सत्कार करण्यात आले. तसेच सर्व उपस्थितांना मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत हरित शपथ दिली. त्यानंतर नागेश विद्यालय येथे जामखेड नगरपरिषद मार्फत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यानुसार जामखेड शहरातील विविध शाळा ,कॉलेज मधील विध्यार्थी यांना उत्सुर्फ सहभाग घेतला होता. वरील सर्व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.नगराध्यक्ष श्री.निखील घायतडक यांनी भूषवले तसेच
प्रमुख पाहुणे म्हणून सुनंदाताई पवार उपस्थित होते.
जामखेड नगरपरिषद मुख्याधिकारी श्री.मिनिनाथ दंडवते अधिकारी, कर्मचारी तसेच श्री.नागेश विद्यालयाचे
मुख्याध्यापक, हरिभाऊ ढवळे, शिक्षक व विध्यार्थी ल.ना.होशिंग महाविद्यालयचे प्राचार्य श्रीकांत होशिंग, शिक्षक व विध्यार्थी , जामखेड महाविद्यालयचे प्राचार्य अविनाश फलके, शिक्षक, विद्यार्थी तसेच नगरसेविका प्रितीताई विकास राळेभात, नगरसेवक दिगांबर चव्हाण,
धनश्री मोहन पवार, व अन्य मान्यवर उपस्थित होते.