जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
कार गाडीचे झालेले नुकसानीचे ५० हजार रुपये दे म्हणत लोखंडी पाईपने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत मालट्रक चे समोरील काचेवर दगड मारून अंदाजे 5000/- रुपयाचे नुकसान करून स्वतः च्या गाडीतच तब्बल साडे नऊ तास डांबून ठेवले प्रकरणी ट्रक चालक जितेन्द्र कुमार जगदीश राणा (वय 43 वर्ष) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच अज्ञात (अनोळखी) जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची घटना घडली आहे.
ADVERTISEMENT 

या बाबत जामखेड पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड ते बीड जाणारे रोडवर बीड कॉर्नर येथे अज्ञात पाच जणांनी दि. ९ जानेवारी रोजी रात्री १२ : ३० वाजेच्या सुमारास त्यांचेकडील कार क्रमांक MH 02 CW. 7263 ही जितेन्द्र कुमार राणा यांच्या ट्रकला आडवी लावून आरोपी फिर्यादीस म्हणाले की, तू आमच्या कारला अहमदनगर आर्मी परिसरात जकात नाक्या जवळ अपघात केल्याने आमच्या कारचे नुकसान झालेले आहे. त्याची नुकसान भरपाई करून दे असे म्हणून पाईप व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचे पैकी २ इसमांनी मला बळजबरीने माझ्याच ट्रक मध्ये बसवून तसेच स्वतः देखील ट्रक मध्ये बसून मला ट्रक चालविण्यास लावून जामखेड शिवारातील बालाजी फर्निचर दुकानासमोर घेऊन जाऊन आरोपींनी सकाळी १०:०० वाजेपर्यंत फिर्यादीचे वरील मालट्रक मध्ये डांबून ठेवून लोखंडी पाईपने पायावर तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. तसेच फिर्यादीचे मालट्रक चे समोरील काचेवर दगड मारून अंदाजे ५००० रुपयाचे नुकसान केले आहे.
यावरून फिर्यादी जितेन्द्र कुमार जगदीश राणा वय (४३) वर्ष धंदा ड्रायव्हर राहणार रो हाऊस नंबर ०८ व्ही साईधाम रो हाऊस भुजबळ लेडीज होस्टेल जवळ धात्रक फाटा पंचवटी नाशिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी पाच गुन्हेगारांविरोधात भादवि कलम 341, 363, 324, 323, 143, 147, 148, 427 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक फौजदार महादेव गाडे हे करत आहेत.