पदरमोड करून सुरू असलेल्या सामाजिक कार्यामुळे रमेश आजबे यांची ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण कल्याण समितीच्या नियामक मंडळावर नेमणूक

0
167
जामखेड प्रतिनिधी
सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांचे पदरमोड करून सुरू असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत लोकप्रिय आमदार रोहित पवार यांनी त्यांची निवड जामखेड ग्रामीण रूग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीच्या नियामक मंडळाच्या सदस्यपदी नेमणूक केल्याने आजबे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
   गेल्या अनेक वर्षांपासून आजबे यांचे पदरमोड करून कौतुकास्पद असे समाजकार्य सुरू आहे. सामाजिक बांधिलकी जपणारे म्हणून ते परिचित आहेत. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी रमेश आजबे व अशोक धेंडे
 त्यांची निवड केली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य लोकांना निश्चितच फायदा होणार आहे.
          रमेश आजबे यांनी सहा महिन्यांपूर्वी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांची, त्यांच्या नातेवाईकांची व कर्मचार्‍यांची पिण्याच्या पाण्याची होणारी गैरसोय ओळखून रमेश आजबे यांनी रूग्णालय आवारात स्वखर्चातून बोअरवेल घेऊन त्यावर विद्युत मोटार बसवल्याने रूग्णालयातील रूग्ण, नातेवाईक व कर्मचार्‍यांची पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याने रुग्णांनी समाधान व्यक्त केले होते.
     येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज शंभर ते दीडशे पेशंट दररोज येतात बरोबर नातेवाईक असतात तसेच अनेक कर्मचारी येथे राहतात यांचे पिण्याचे पाण्याचे खुपच हाल होत होते. ही अडचण समाजसेवक रमेश आजबे यांनी ओळखली व स्वखर्चातून बोअरवेल घेतला चांगले पाणीही लागले लगेच विद्युत मोटार बसवल्याने रूग्णालयातील रूग्ण व कर्मचार्‍यांनी समाधान व्यक्त केले होते.
      रमेश आजबे यांनी जामखेड शहरात अनेक समाजोपयोगी कामे पदरमोड करून केलेली आहेत. बीड रोड पासून ल. ना. होशिंग विद्यालय व जामखेड महाविद्यालय हा अनेक वर्षांपासून बंद असलेला रस्ता मोकळा करून त्यावर पेव्हिंग ब्लाॅक टाळल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा खुपच फायदा झाला आहे. एक ते दीड किलोमीटर अंतर वाचलेले आहे. तसेच ल. ना. होशिंग विद्यालयाच्या समोर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आजबे यांनी वृक्षारोपण केले व या झाडांना संरक्षण जाळी बसवली व संपूर्ण उन्हाळ्यात स्वतः टॅकरद्वारे पाणी घातले यामुळे आता ही झाडे चांगले झाले आहेत. तसेच जिजाऊ नगरमध्ये रस्ता तयार करून बंदिस्त गटारे बांधकाम केले यामुळे येथील दुर्गंधी नष्ट झाली आहे.
    आता ग्रामीण रुग्णालयात बोअरवेल घेतल्याने रूग्ण, नातेवाईक व कर्मचार्‍यांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. यामुळे रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आजबे यांचे आभार मानले. या सर्व कार्याची दखल घेत आमदार रोहित पवार यांनी आजबे यांची ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीच्या नियामक मंडळावर नेमणूक केली आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here