जामखेड प्रतिनिधी
महिला-मुली व वृद्धांना आत्मविश्वासाने जगण्यासाठी कर्जत-जामखेड व श्रीगोंदे या तीन तालुक्यात भरोसा सेल सुरू करण्यात आले आहे. मुलींनी न लाजता व न भीता पोलीसांची मदत घेऊन अन्यायाविरुद्ध लढा आपणास न्याय मिळेल. असे प्रतिपादन सुनंदाताई पवार यांनी केले.
एकात्मिक विकास प्रकल्पातून गस्तीसाठी दोन दुचाकी व एक चारचाकी वाहन जामखेड पोलिस स्टेशनला हस्तांतरित करण्यात आले यावेळी सुनंदाताई पवार बोलत होत्या. यावेळी कर्जत जामखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, तहसीलदार विशाल नाईकवाडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार, सौभाग्यवती कुंतीताई पवार, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, ज्योती बेलेकर, पंचायत समिती सभापती राजश्री मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, संजय कोठारी, प्रा. लक्ष्मण ढेपे, हर्षल डोके, नगरसेवक दिंगाबर चव्हाण, प्राचार्य श्रीकांत होशिंग, हरीभाऊ ढवळे, पर्यवेक्षक रमेश अडसूळ, मयुर भोसले, राजेश वाव्हळ, राजू गोरे, अमोल लोहकरे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुनंदाताई पवार म्हणाल्या की, कर्जत जामखेड मतदार संघात मोठ्या प्रमाणावर बालविवाह होतात यामुळे स्त्रीयांचे आरोग्य धोक्यात येते हे सर्व आपणास रोखायचे आहे. पुर्वी कर्जत जामखेड मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी दहशत होती याचा सामान्य लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. कर्जत जामखेड ची विकासाच्या बाबतीत योग्य ओळख निर्माण होण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी चांगले अधिकारी रत्ने आणलेली आहेत. शहरासह तालुक्यात चांगली शिस्त निर्माण झाली आहे. आता पावसाचे पाणी अडवून साठवणूक करावयाची आहे व विजेसाठी सोलरचा जास्तीत जास्त वापर करावयाचा आहे.

यावेळी बोलताना जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड म्हणाले की, आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत. मुलींच्या सुरक्षिततेसाठी आम्ही मुलीच्या स्वच्छता गृहात तक्रार पेटी ठेवणार आहोत. महिला शिक्षिकेच्या मदतीने पेटी उघडण्यात येईल. मिळालेल्या वाहनांचा उपयोग गस्त वाढवण्यासाठी व गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी होणार आहे.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी शहरासह तालुक्यातील अनेक गावांमधे रस्त्यावर दिवसाही लाईट सुरू असते यामुळे मोठय़ा प्रमाणात विजेचा अपव्यय होतो तो कमी करण्यासाठी अॅटो सेन्सार बसविण्यात यावेत अशी मागणी केली.
उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव म्हणाले की, मिळालेल्या वाहनांमुळे आम्हाला चांगले काम करता येणार आहे. रात्रीच्या पेट्रोलिंग व गस्तीसाठी हि वाहने उपयोगी ठरतील. यापुढे पोलीस संवादातून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतील
तहसीलदार विशाल नाईकवाडे बोलताना म्हणाले की, आमदार रोहित पवार हे मतदारसंघाचे पालक म्हणून काम करत आहेत. वर्षभरात अनेक प्रश्न सोडविले आहेत व
लवकरच खर्डा पोलीस स्टेशन, पोलीस वसाहत व तलाठी कार्यालय सुरू होणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा नवा पॅटर्न कर्जत जामखेडमध्ये उदयास येईल व तो राज्यभर राबविला जाईल.
यावेळी बोलताना मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते म्हणाले की, मी अकरा वर्षे नोकरी केली दोन वेळा राजीनामा देण्याचा प्रयत्न केला पण जामखेड शहरात आल्यावर इथे मोकळेपणाने काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे पदाधिकारी हस्तसेफ नाही. मी माझा आत्मविश्वास वाढावा म्हणून रोज छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचा विचार वाचतो. आई प्रमाणे सुनंदाताई काळजी करतात.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे म्हणाले की, रोहित पवार आमदार होण्या आगोदर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे जिल्ह्याचे पालकमंत्री होते तरीही तालुक्यात प्रभारीराज होते. पाच वर्षात नगरपरिषदेस 18 मुख्याधिकारी मिळाले. सध्या आमदार रोहित पवार यांनी तालुक्यासाठी सिंघम अधिकारी आणले आहेत. यामुळे जामखेडची नवी ओळख निर्माण होत आहे.





