महाराष्ट्र राज्य कुस्ती-मल्लविद्या पदाधिकाऱ्यांचा 31 जानेवारी रोजी राज्यव्यापी मेळावा कोल्हापूरला – शिल्पा मत्रे

0
243
जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कुस्ती-मल्लविद्या महासंघ सर्व पदाधिकारी यांचा राज्यव्यापी महामेळावा रविवार दिनांक 31 जानेवारी 2021 रोजी दुपारी 11 वाजता श्रीदत्त समर्थ सांस्कृतिक हॉल कोल्हापूर-पन्हाळगड रोड कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला असून सदर कार्यक्रमात महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रातील दिग्गज अवलीयांची उपस्थिती लाभणार आहे. अशी माहिती शिल्पा महादेव मत्रे,  अध्यक्ष महिला कुस्ती मल्लविद्या,अहमदनगर यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी  प्रमुख अतिथी छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर तर मेळाव्याचे अध्यक्ष अर्जुनवीर पैलवान काकासाहेब पवार मेळाव्याचे स्वागत अध्यक्ष अर्जुनवीर पैलवान राहुल आवारे (पोलीस उप अधीक्षक) तर प्रमुख पाहुणे म्हणून
महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर, पैलवान दत्ता गायकवाड,  पैलवान दिलीप ( नाना ) भरणे, धनाजी पाटील आटकेकर, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, हिंदकेसरी दीनानाथ सिंहकुस्ती सम्राट असलम काझी, हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ (आबा), सेना केसरी पैलवान गुंडाजी पाटील, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान रविंद्र पाटील, वस्ताद ज्ञानेश्वर मांगडे, पैलवान वैभव (दादा ) लांडगे पैलवान पृथ्वीराज संभाजीराव पवार, ऑलम्पिक वीर बंडा पाटील रेटरेकर, महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम, महाराष्ट्र केसरी संभाजी पाटील आसगावकर, महाराष्ट्र केसरी पैलवान नामदेव मोळे, वस्ताद विश्वास दादा हारुगले, राष्ट्रीय कुस्ती कोच आनंदराव धुमाळ, समाजसेवक दीपक पाटील, पैलवान रणजीत खाशाबा जाधव यासह अनेक नामवंत मल्ल उपस्थित राहणार आहेत.
कुस्ती-मल्लविद्या महासंघातर्फे वर्षभर कुस्तीसाठी अनेक कार्यक्रम उपक्रम राबवले जातात. संस्थेमार्फत आजवर आणि तिच्यावर पैलवानांच्या शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. कुस्ती-मल्लविद्या फेसबुक फेसबुक कुस्ती-मल्लविद्या युट्युब चॅनेल द्वारे दररोज होणाऱ्या कुस्त्यांची व्हिडिओ बातम्या प्रदर्शित करून सुशिक्षित समाजापर्यंत कुस्ती पोहोचवण्याचे काम केले जाते. अनेक कुस्ती मैदानाचे थेट प्रक्षेपण करून कुस्तीला तब्बल 52 देशात प्रसिद्ध केले जाते. सदर मेळाव्यात महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या 365 तालुक्यातील पदाधिकारी यांचा महामेळावा होऊन यामध्ये संस्थेच्या पुढील वाटचालीबाबत विचार विनिमय करण्यात येणार आहे.
  या कार्यक्रमासाठी निमंत्रक म्हणून पैलवान गणेश मानुगडे  संस्थापक कुस्ती-मल्लविद्या महासंघ
कार्यक्रमाचे ठिकाण श्रीदत्तसमर्थ सांस्कृतिक हॉल
कोल्हापूर-पन्हाळगड रोड श्रीशिवाजी पुलानाजीक
कोल्हापूर रविवार दिनांक 31 जानेवारी 2021 दुपारी 11 वा. आयोजित करण्यात आले आहे.
सौजन्य कोल्हापूर जिल्हा कुस्ती महासंघ महाराष्ट्र राज्य असे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here