जामखेड प्रतिनिधी
सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते रमेश ( दादा ) आजबे मित्रमंडळाच्या वतीने महिला सफाई कामगार व आरोग्य विभागातील महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर महिला उपस्थित होत्या महिलांना वाण देऊन आरोग्याची काळजी घेण्याविषयी मार्गदर्शन अश्विनीताई आजबे यांनी केले.

सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते रमेश ( दादा.) आजबे मित्रमंडळाच्या वतीने महिला शहरातील विविध भागात हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नगरपरिषदेच्या स्वच्छता व आरोग्य विभागातील महिलांसाठी खास हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन अश्विनीताई आजबे यांनी केले होते यावेळी महिलांची ओटी भरून त्यांना वाण देण्यात आले. त्यानंतर महिलांवर वाढलेल्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त करत महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृतीपर विचार मांडण्यात आले. स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर महिला उपस्थित होत्या. प्रथमच झालेल्या या कार्यक्रमामुळे महिला भारावून गेल्या होत्या. सर्वानी आजबे यांना धन्यवाद दिले.