जामखेड न्युज – – –
आरोग्य विभागाच्या गट ‘क’ पेपरफुटी (Health Department exam paper leak case) प्रकरणात, पुण्याच्या सायबर विभागाच्या पथकाने (Pune Police Cyber cell) बीडमधून एका जिल्हा परिषद शिक्षकाला अटक (ZP teacher arrest from Beed) केली आहे. नागरगोजे नामक हा शिक्षक असून गेल्या 15 दिवसांपासून पुण्याचे पथक बीडमध्ये शिक्षक नागरगोजेचा शोध घेत होते. एकदा तर पथक शाळेवर धडकण्यापूर्वीच तो पथकाला गुंगारा देऊन फरार झाला होता. मात्र काल अखेर पथकाला त्याचा सुगावा लागताच, नागरगोजेला शाळेतून उचलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
आरोग्य विभागाच्या गट क पेपरफुटी प्रकरणात बिडमधून नागरगोजे नामक शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसांपासून याचा शोध सुरू होता. आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फोडण्यात याचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालं आहे. आरोग्य विभागाच्या पेपरफुटी,तसेच म्हाडा आणि त्यानंतर टीईटी पेपरफुटी प्रकरणात आत्ता पर्यंत पुणे पोलिसांच्यावतीने 35 जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांचा पेपेरफुटी प्रकरणात संबंध असल्याचं निष्पन्न झालं आहे.
ADVERTISEMENT 

पेपर कोणतंही असू द्या यात या दलालांची एक साखळी असून जे लोक प्रश्नपत्रिका तयार करतात यांच्या जवळीक असून हे सर्व दलाल विद्यार्थ्यांना एकत्रित करायचे आणि परीक्षेच्या एक दिवसआधी परीक्षार्थींना सर्व प्रश्न पाठ करून दयायचे असं या दलालांचा काम होता अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
या अगोदर पेपटफुटी प्रकरणात बीडच्या शिरूर तालुक्यातील, तितरवणी येथील शिक्षक उद्धव प्रल्हाद नागरगोजे याला अटक करण्यात आलेली होती. याच उद्धव नागरगोजेचा आणि या गळाला लागलेल्या जिल्हा परिषद शिक्षक नागरगोजेचा जवळून संबंध असल्याचं बोललं जातंय. शिवाय वडझरी पॅटर्नच्या संजय सानप याला ज्या मार्गाने गट ‘क’ ची प्रश्नपत्रिका मिळाली त्याच मार्गाने या शिक्षक नागरगोजेला देखील मिळाल्याची चर्चा आहे. बीडमधील नगर रोडवरील एका मंगल कार्यालयात ज्याप्रमाणे संजय सानपचे उमेदवार थांबले होते, त्याचप्रमाणे या शिक्षक नागरगोजेचे देखील उमेदवार नगर रोडवरील एका मंगल कार्यालयात थांबले असल्याचं सांगितलं जातंय. याशिवाय या जिल्हा परिषद शिक्षक नागरगोजेचा संबंध अनेक भरती प्रकरणाशी असल्याची चर्चा आहे. तर अटकेत असलेला आरोपी सुखदेव डेरे आणि शिक्षक नागरगोजे एकमेकांचे खास होते, असेही सांगितले जात आहे.
दरम्यान यापूर्वी बीडमधून बडझरी पॅटर्नच्या डॉ . राजेंद्र सानप आणि संजय सानप याला गट ‘ड’ च्या प्रश्नपत्रिका फुटीमध्ये 20 डिसेंबर रोजी अटक केली होती. याशिवाय बीड जिल्ह्यातील उद्धव प्रल्हाद नागरगोजे, प्रशांत व्यंकट बडगीर, डॉ.संदीप त्रिंबकराव जोगदंड, शाम महादू मस्के, नामदेव विक्रम करांडे इतक्या आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. या सगळ्यांनी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना आणि परीक्षा घेणाऱ्या आयटी कंपन्यांमधील काही लोकांना हाताशी धरून आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फोडण्यात आपला सहभाग नोंदवलेला आहे. त्यामुळं या सर्वांच्या मालमत्तेची देखील चौकशी करावी अशी मागणी सर्वसामान्य बीडकरांमधून होत आहे.