गावाच्या वनराईचे संरक्षण करा – प्रा. आय. य. पवार

0
145
जामखेड प्रतिनिधी
.. निसर्ग हा महाबलवान असून निसर्ग सृष्टी च माणसाला जगविते. माणसे अविचराने झाडांची कत्तल करून वारंवारच्या दुष्काळाचे संकट ओढवून घेतात.झाडे आँक्सिजन देतात,तसेच वेळच्यावेळी पाऊस आणतात.गावच्या बळकटीसाठी व शिवाराच्या समृद्धीसाठी वनराईचे रक्षण करा, असे आवाहन प्रसिद्ध लेखक प्रा.आ.य. पवार यांनी केले.
बावी येथे ग्रामपंचायत कार्यालय व पर्यावरण समितीच्यावतीने मारुती मंदिरासमोर माझी वसुंधरा अभियान प्रा.आ.य.पवार यांचे
अध्यक्षतेखाली संपन्न झाले.यावेळी गावच्या वनराईचे रक्षणाची शपथ ग्रामस्थांनी घेतली. याप्रसंगी देवकर गुरुजी, सदाशिव पवार, लियाकत सय्यद, चतुर्भुज मुरुमकर, दत्ता पवार, दादा मंडलिक, इमाम पठाण,महादेव शिंदे, रामदास पवार, अशोक शिंदे, संतोष पवार, आशाबाई निकम,इन्नुस सय्यद दसरथ पाटील ,निलेश पवार,गुलु शेख,मधू पवार आदी मान्यवर उपस्थित होते, ग्रामसेवक फरताडे यांनी आभार मानले.यावेळी  सर्वांना मास्क देणे त आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here