Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या एसटी कर्मचाऱ्यांचा संयम अखेर सुटला औरंगाबादमध्ये ७ आगारातील कर्मचारी होऊ लागले...

एसटी कर्मचाऱ्यांचा संयम अखेर सुटला औरंगाबादमध्ये ७ आगारातील कर्मचारी होऊ लागले हजर

0
260
जामखेड न्युज – – – – 
दोन महिने होत आले तरीही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून आपल्या संपावर ठाम आहेत. मात्र, असे असताना संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचा संयम सुटत चालला असून अनेक जण कामावर हजर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी ७ आगारातील लाल परी रस्त्यावर धावल्या. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आता फूट पडली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात सर्वच आगारातील कर्मचारी सुरवातीला संपावर गेले होते. मात्र, जसजसे दिवस वाढत चालले आणि संघटना सुद्धा साथ सोडू लागल्या, आशावेळी आता संप ताणून धरल्याने काही फायदा होणार नाही असे म्हणत अनेक कर्मचारी कामावर हजर होत आहे. बुधवारी औरंगाबाद जिल्ह्यातील ७ आगारातील १०१ बस रस्त्यावर धावल्या. तर या १०१ बसच्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत २४६ फेऱ्या झाल्यात. बुधवारपर्यंत जिल्ह्यातील १०४ चालक आणि ५७ वाहक हजर झाले. त्यामुळे जिल्ह्यात सद्या ६४२ कर्मचारी कामावर आहेत.
एसटी संपाबाबत रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. आधी भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी संपातून माघार घेतली. त्यानंतरही संप सुरूच होता. पण २० तारखेच्या सुनावणीनंतर अजय गुजर यांनी सुध्दा माघार घेतली आणि संपात उभी फूट पडली. त्यामुळे आता संप नाही तर आम्ही दुखवट्यात असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांची बाजू न्यायालयात मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हंटलं. पण त्यानंतर कामावर हजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, संपात फूट पडत असल्याच बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!