जामखेड न्युज – – – –
रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय संकुलामध्ये 22 डिसेंबर थोर गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी कन्या विद्यालय व नागेश विद्यालय सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ गणित शिक्षक साळुंके बी एस, प्रमुख उपस्थिती नागेश विद्यालयाचे प्राचार्य श्री मडके बी.के, कन्या विद्यालय मुख्याध्यापिका सौ चौधरी के डी, उपप्राचार्य तांबे पी एन , पर्यवेक्षक साळवे डी एन, प्रकाश सोनवणे , संतोष ससाने, गोपाल बाबर, श्रीम आंधळे एस बी, श्रीम बोळे मॅडम , सांगळे ए एम गणित शिक्षक उपस्थित होते.
सुरुवातीस थोर गणित तज्ञ श्रीनीवास रामानुजन यांचे प्रतिमापूजन करण्यात आले व सर्व गणित शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी गीते तुषार, कोल्हे अजिंक्य, सांगळे सायली, घायतडक विद्या, वराडे प्रणव, पिंपळे सिध्येश, यां विद्यार्थ्यांनी भाषण केले.
गणित प्रयोग, उपक्रम प्रात्यक्षिक व कोडे यांचे इ ६वी,८वी,९वी च्या विद्यार्थ्यांनी व्यसपीठावर प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.
गणित संवाद इ ७ वी च्या विद्यार्थ्यांनी नाटक स्वरूपात करून दाखवले
त्रिकोणाचे प्रकार – सार्थक जगदाळे, पांडुळे ओंकार,
गणित घड्याळ माहिती-प्रथमेश बिरंगळ,
कोणाचे प्रकार व गुणधर्म- आदित्य गोरे, कृष्णा माने, चौकोणाचे गुणधर्म-मंथन देशमुख,
गणिती कोडे- ६ वीचे लटके साइराज, बादल शेखर,पर्जने प्रणव , सानप सिध्येश्वर या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक सादर केले.
प्राचार्य श्री मडके बी के यांनी मनोगत मध्ये राष्ट्रीय गणित दिन निमित्त शुभेच्छा देऊन व विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विविध गणिती कोडे सांगून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री साळुंके बी एस यांनी राष्ट्रीय गणित दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी हसत खेळत गणित शिकून गणिताचा चांगला अभ्यास करावा असे मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन मध्ये श्री संतोष ससाणे यांनी विविध गणिती कोडे, विविध प्रयोग , गणित शोध यांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पर्यवेक्षक प्रकाश सोनवणे यांनी केले.









