Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या शिष्यवृत्तींसाठी 31 जानेवारीपूर्वी ऑनलाईन अर्ज करण्‍याचे आवाहन

शिष्यवृत्तींसाठी 31 जानेवारीपूर्वी ऑनलाईन अर्ज करण्‍याचे आवाहन

0
220
जामखेड न्युज – – –
 सामाजिक न्याय आणि इतर मागास बहुजन कल्‍याण विभागाच्या भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती या योजनेसाठी 2020-21 मधील नव्याने अर्ज करणे व 2021-22 या नवीन शैक्षणिक वर्षातील नवीन अर्ज 31 जानेवारी 2022 पूर्वी ऑनलाईन भरून समाज कल्याण विभागाकडे सादर करावेत. असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकृष्ण देवढे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
         अहमदनगर जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी विहित मुदतीमध्ये आपले शिष्यवृत्ती अर्ज  http://mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावरती भरुन ते ऑनलाईन पध्दतीने आणि ऑफलाईन (हार्ड कॉपी) पध्दतीने आपल्या महाविद्यालयाकडे जमा करावेत.
      ज्या विद्यार्थ्यांनी महाडिबीटीवर यापूर्वी आधार संलग्नित युजर आयडी तयार करुन अर्ज भरलेले आहेत त्यांनी नवीन नॉन आधार युजर आयडी तयार करु नये. नवीन नॉन आधार युजर आयडीवरुन अर्ज नुतनीकरण केल्यास व एका पेक्षा जास्त युजर आयडी तयार केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी व महाविद्यालयांची राहील. अर्ज भरण्याबाबत काही तांत्रिक अडचणी असल्यास आपण प्रवेशीत असणा-या महाविद्यालयाशी संपर्क साधावा किंवा सदरच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या Grievance/ Suggestions या टॅबद्वारे आपली अडचण संकेतस्थळावर नोंदविण्यात यावी.असे आवाहन ही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, अहमदनगर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!