जामखेड न्युज – – – –
मी केजकरांची सून आहे आणि केज माझं घर, कुटुंब आहे त्यामुळे घर सांभाळण्याची व घर टापटीप ठेवण्याची जबाबदारी माझी आहे त्यामुळे केजकरांनी घाबरण्याचे कारण नाही लवकरच केजचा व्यापारी संकुलाचा प्रश्न एक वर्षात मार्गी लावू आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टी साठी आम्ही दुसऱ्यांच्या दारात जाऊ देणार नाही असे मत राज्यसभेच्या खासदार व काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या रजनीताई पाटील यांनी केज नगरपंचायत च्या प्रचाराच्या समारोपप्रसंगी बोलताना सांगितले.
केज मध्ये आमचे आज्जे सासरे, सासरे व पती अशोक पाटील यांनीच अत्यावश्यक असलेल्या पाणी योजना, लाईट, रस्ते ग्रामीण रुग्णालय अशी कामे केलेली आहेत व येणाऱ्या काळात देखील आम्हीच केजचा विकास करू केजला बाहेरचा माणूस येऊन विकास करू शकत नाही त्यासाठी त्या गावाशी नाळ जोडलेली असली पाहिजे आणि ती नाळ आमच्या पाटील कुटुंबाची जोडलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या या पाच वर्षांत ज्या काही समस्या असतील त्या देखील तातडीने पूर्ण करण्याचा प्रयत्न आमचा राहील. त्याच बरोबर शहरात आता वाढीव पाईपलाईन चा प्रस्ताव मंजूर आहे परंतु मधल्या काळात कोरोनामुळे ही कामे प्रलंबीत होती ती आता सुरू होतील तसेच आगामी काळात शहरात बाल उद्यान, प्रत्येक वॉर्डात शुद्ध पाण्याचे प्लँट, भव्य क्रीडा संकुल, नाट्यगृह याची उभारणी होईल यासाठी योग्य जागांची चाचपणी सुरू आहे. महिलांसाठी लघु व गृह उद्योग आपण तातडीने सुरू करणार आहोत यासाठी महिलांनी देखील आमच्या पदाधिकाऱ्यांना भेटून याबाबत माहिती घ्यावी असे रजनीताई पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्याचबरोबर संजय गांधी योजनेतून अनेक वंचीत व निराधार मंडळींना आमच्या सदस्यांनी लाभ देण्याचे काम केले आहे व यापुढेही ते सुरूच राहील. आम्ही निष्पाप पणाने काम करत आहोत व केजचे काम करणं म्हणजे आम्ही काही उपकार करत नाहीत तर ते आमचे कर्तव्य आहे असेही यावेळी रजनीताई पाटील यांनी म्हटले.
टायगर अभी जिंदा है – अशोक पाटील
यावेळी बोलताना माजी मंत्री अशोक पाटील यांनी विरोधकांची चांगलीच हजेरी घेतली केजमध्ये कोणी काय केले हे जनतेला चांगल माहीत आहे पण विरोधकांनी विधायक कामांना विरोध करून व्यापारी संकुलाच प्रश्न अडकवून टाकला मात्र आता लवकरच त्यावर निर्णय होईल आणि अनेकजण म्हणतात की अशोक पाटील कुठे दिसतच नाहीत, येतच नाहीत त्यावर वाघ कुठेही दिसत नसतो तो कधीतरी दिसतो असे म्हणत टायगर अभी जिंदा है म्हणताच जोरदार टाळ्या पडल्या.
आम्ही करोडोंच्या गप्पा मारणार नाहीत – रजनीताई पाटील
आम्ही विरोधकांच्या प्रमाणे करोडोंच्या घोषणा करणार नाहीत परंतु माझ्या केजकरांना कोणाच्याही दारात देखील जाऊ देणार नाही जे काही लागेल ते मी माझ्या केजला पुरवणार आहे मी एक राजकीय नेता म्हणून हे बोलत नाही तर या गावची सून म्हणून बोलत आहे असा टोलाही त्यांनी करोडोंच्या घोषणा करणारांना यावेळी लगावला.
यावेळी माजी मंत्री अशोक पाटील, आदित्य पाटील, राजेसाहेब देशमुख, सुरेश पाटील यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राहुल सोनवणे यांनी केले तर सूत्रसंचलन प्रविण शेप यांनी केले. यावेळी १३ प्रभागातील सर्व उमेदवार यांच्यासह काँग्रेसचे हनुमंत मोरे, किरण पाटील, गणेश राऊत, अनंत जगतकर, बहादूर भाई, अनिल मुंडे, नवनाथ थोटे, आप्पासाहेब इखे, प्रकाश भन्साळी, गणेश बदगुडे, राहुल टेकाळे, कविता कराड, संगिता साळवे, पशुपतीनाथ दांगट यांच्यासह पदाधिकारी, महिला यांची मोठी उपस्थिती होती.