जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगावची निवड झाली आहे. यामुळे शाळेतील शिक्षक व ग्रामस्थांनी भौतिक सुधारणेबरोबरच गुणवत्ता वाढीसाठी कंबर कसली आहे. व हिरीरीने कामाला सुरुवात केली आहे
महाराष्ट्र राज्यातील एकुण शंभर शाळांची निवड या अभियानात करण्यात आली आहे यामधे जामखेड तालुक्यातील सावरगावच्या शाळेची निवड करण्यात आली आहे यासाठी भौतिक सुशोभीकरणाबरोबरच शाळेची व गावाच्या बोलक्या भिंती केल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन मार्फत शाळेसाठी तीन लाख रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये दरवाजे व खिडक्या दुरूस्ती नवीन दरवाजा बसवणे यासाठी पंचवीस हजार रुपये, वर्गखोल्यांचे पत्रे टाकणे पस्तीस हजार रुपये, शाळेची किरकोळ दुरुस्ती चाळीस हजार रुपये, असा खर्च करायचा आहे. गावाच्या व शाळेच्या लक्या भिंती करणेसाठी साठ हजार रुपये, सात इंची टॅब घेणे एक लाख वीस हजार रुपये, विज्ञान शाळा पंधरा हजार रुपये, बॅनर वर डॉक्युमेंटेशन पाच हजार रुपये
आदर्श शाळेचे काम सुरू करण्याचा नारळ फोडण्यात आला यावेळी दादाहरी नरहरी थोरात व नितीन सपकाळ यांनी लगेच दरवाजा व खिडक्या देण्याचे कबूल केले. तुषार पाटील यांनी पाच हजार रुपये देणगी व दादासाहेब कदम यांनी पाच हजार रुपये देणगी देण्याचे कबूल केले.
कामाच्या शुभारंभ प्रसंगी दादा हरी थोरात, नितीन सपकाळ, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जनार्दन चव्हाण, उपाध्यक्ष हनुमंत फाळके, अनिल माने,शिवाजी वाघ, सरपंच काकासाहेब चव्हाण, बबन वाघमारे, महादेव फाळके, शरद सपकाळ, शेषराव चव्हाण, अशोक चव्हाण, विलास समुद्र, प्रवीण थोरात, साईनाथ तनपुरे, पप्पू सपकाळ, सचिन चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक भगवान समुद्र, शिक्षिका आशा वराट, निर्मला सिद्धेश्वर, सरिता मिसाळ, मीना बोडके आदी उपस्थित होते.