जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील अरणगाव (पारेवाडी) रामभाऊ जयवंता वडवकर (वय 75) हे दोन दिवसापूर्वी आपल्या शेतातील गोठ्यातल्या गुरांना वैरण टाळण्यासाठी गेले असता सर्प दंश झाला शेजारच्या लोकांनी त्यांना तातडीने जामखेड येथिल खाजगी हॉस्पिटलमधे दाखल केले. पण उपचारादरम्यान तिसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. यामुळे अरणगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या मागे तीन मुली दोन मुले असा परिवार आहे.
अशी माहिती अरणगावचे मा. सरपंच लहू शिंदे यांनी दिली.