जामखेड न्युज – – –
एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर आंदोलन सुरु केले होते. दोन प्रमुख मागण्यांसाठी एस टी कर्मचारी आंदोलन करत आहेत. यामध्ये योग्य वेतन वाढ आणि राज्य शासनात विलीनीकरण या दोन मागण्या आहेत.
काही आगारामध्ये एसटी कर्मचारी कामावर परतले आहेत तर काही कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. वेतन वाढ केल्यानंतर हे कर्मचारी कामावर परतले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी शेवटचा अल्टिमेटम दिला आहे.
जे कर्मचारी सोमवारपर्यंत कामावर हजर राहतील त्यांचे निलंबन मागे घेतले जाईल. जे कर्मचारी अगोदर कामावर परतले आहेत त्यांना वेतन वाढ देण्यात आली आहे. सोमवारपर्यंत जे येतील त्यांनाही वेतन वाढ दिली जाईल असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे.
सोमवारपर्यंत जे कर्मचारी कामाला येतील त्यांना कामावर घेतले जाईल. जे कर्मचारी येणार नाहीत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल. निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा कामावर यावे त्यांना ही संधी दिली जाईल.
कुणाला अडवण्यात आले तर त्यांना पोलीस संरक्षण दिले जाईल. असे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले. एसटी ही २०१८ च्या नियमानुसार अत्यावश्यक सेवेत येते. त्यामुळे मेस्माची कारवाई करता येते.
सोमवारपर्यंत आम्ही कोणत्याही कर्मचाऱ्यावर मेस्मा लावणार नाही असेही परब म्हणाले. तरीही माणुसकीच्या दृष्टीने विचार करुन कामगारांना संधी दिली जाईल. आतापर्यंत एसटीचे ५५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असेही परब यांनी सांगितले आहे.









