Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या पाथर्डी : शेवगाव रोडवर धाडसी दरोडा; तिघांना जबर मारहाण, एक गंभीर. पोलीस...

पाथर्डी : शेवगाव रोडवर धाडसी दरोडा; तिघांना जबर मारहाण, एक गंभीर. पोलीस तपास सूरू

0
221
जामखेड न्युज – – – 
पाथर्डी शहरातील शेवगाव रोडवर असणाऱ्या चितळे वस्तीवर अज्ञात सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकून तीन वयोवृद्धांना जबर मारहाण केली असून यामध्ये लिंबाजी नाथा चितळे हे गंभीर जखमी झाले आहेत.तर इतर दोघांनाही जबर मार लागला असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
शुक्रवारी मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास शेवगाव रोडवरील प्रेमश्री पेट्रोल पंपासमोर राहणाऱ्या लिंबाजी चितळे यांच्या घरावर सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकला.
लिंबाजी नाथा चितळे (वय ६५,) बाबुराव गुणाजी उळगे (वय ६५,) कमलबाई लिंबाजी चितळे (वय ५८)सर्व रा.शेवगावरोड, चितळेवस्ती,पाथर्डी ) यांना कुऱ्हाड व दांड्याच्या साहायाने मारहाण करण्यात आली. जखमींच्या डोक्याला जबर मार लागला असून हात फॅक्चर झाले आहेत.
प्रथम दरोडे खोरांनी बाहेर झोपलेल्या कमलबाई चितळे यांना जबर मारहाण केली.त्यांनतर घराचा दरवाज्या तोडून घरात झोपलेल्या लिंबाजी चितळे,बाबुराव गुणाजी उळगे, लक्ष्मीबाई उळगे यांच्यापैकी लिंबाजी व बाबुराव यांना जबर मारहाण केली.लक्ष्मीबाई उळगे वय ६०(रा शेवगावरोड, चितळेवस्ती,पाथर्डी) यांनी त्यांच्याकडील गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र,कानातील सोन्याचे दागिने दरोडेखोरांना काढून दिले.त्यांना मात्र दरोडे खोरांनी मारहाण केली नाही.
या घटनेत सोन्याच्या दागिन्यांसह २० हजारांची रोख रक्कम आरोपींनी लांबवली असल्याची प्राथमिक माहिती समजत आहे.नगरहून आलेल्या डॉग स्क्वाडने घटनास्थळापासून साधारण अर्धा किलोमीटरच्या अंतरावर माग दाखवला आहे.पाथर्डी पोलिसांकडून बारकाईने तपासणी चालू असून काही पुरावे हाती लागतात याचा शोध घेतला जात आहे.याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!