Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या खर्डा परिसरात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

खर्डा परिसरात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

0
272
जामखेड न्युज – – – 
तालुक्यातील खर्डा येथिल कानिफनाथ मंदिराच्या परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या व्यक्ती ची उद्याप ओळख पटलेली नाही.
याबाबत माहिती अशी की दिनांक ७ डिसेंबर रोजी
दुपारी येथील प्रमोद मोहन लोखंडे हे खर्डा जवळील
कानिफनाथ मंदिराच्या परिसरात शेळ्या चारत होते.
मंदीराच्या रोड जवळील खदानीत एक अनोळखी
इसमाचे प्रेत पाण्यात तरंगताना त्यांना दिसून आले.
त्यांनी तात्काळ जामखेड पोलिस स्टेशनशी संपर्क
साधून फोनवर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर
पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी
केल्यानंतर अज्ञात इसमाच्या अंगावर फिकट गुलाबी
रंगाचा व त्यावर टिपके असलेला फुल भाईचा शर्ट,
पांढरी पॅट, सावळा रंग, नीम गोरा त्याचा शरीर बांधा
सडपातळ मध्यम चेहरा व केस बारीक असल्याचे
पोलिसांनी सांगितले आहे, या घटनेमुळे खर्डा शहरात
मोठी खळबळ उडाली आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट
आल्यानंतरच या अज्ञात इसमाची हत्या केली आहे का?
त्याने आत्महत्या केली हे समजणार आहे. याबाबत
जामखेड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद
करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली
एपीआय सुनील बडे, पोलीस नाईक संभाजी शेंडे, पोलिस नाईक जायभाय,पो.कॉ.शेषराव म्हस्के हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!